आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’च्या आणखी एका मंत्र्यांच्या घरी सीबीआय धाड, केजरीवाल यांचा खेळ खल्लास : कपिल मिश्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या घरावर लागोपाठ धाडसत्र सुरू केले आहे. आप नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरी नुकतीच धाड टाकल्यानंतर सोमवारी सीबीआय मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरीही हजर झाली. मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांनी जैन यांच्या पत्नीची चौकशी केली. यापूर्वी सीबीआयने सत्येंद्र जैन यांची दोन दिवस चौकशी केली होती. एप्रिल महिन्यात सीबीआयने मनी लाँडरिंग प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आम आदमी पक्षाचे मंत्री असलेले जैन यांच्यावर २०१५-१६ मध्ये ४.१६ कोटी रुपयांचा काळा पैसा वैध बनवल्याचा आरोप आहे. २०१०-१२ मध्ये कोलकाता तसेच दिल्लीच्या कंपनीच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप आहे. 
 
हा सुमारे ११.७८ कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील एकत्रित पुराव्यांच्या आधारे सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. आयकर विभागाच्या सूचनेवरून सीबीआयने हवाला व्यवहाराशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या संबंधांवरून सप्टेंबर २०१६ मध्ये जैन यांनी सीबीआयने समन्स बजावले होते. दरम्यान, सत्येंद्र जैन यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. आम आदमी पक्ष सध्या सीबीआयच्या रडारवर दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच “टॉक टू एके’ या कार्यक्रमाच्या कंत्राटातील घोटाळ्याच्या आरोपावरून सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री 
मनीष शिसाेदिया यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, केजरीवाल यांचा खेळ खल्लास : कपिल मिश्रा...  
बातम्या आणखी आहेत...