नवी दिल्ली - सलग चौथ्या वर्षी सीबीएसई बारावी गणिताच्या प्रश्नपत्रिकेवरून काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. १४ मार्च रोजी झालेला हा पेपर एवढा अवघड हाेता की, तो तीन तासांत सोडवणे कठीण होते. विशेष तज्ज्ञांचेही हेच मत आहे. त्यामुळे हा मुद्दा संसदेत उपस्थित झाला. मात्र, सीबीएसईवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. मंडळाने मागील काही वर्षांप्रमाणे तज्ज्ञांची समिती नेमून गुणात सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यामुळे शाळेत प्रत्येक परीक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यास गणितात चांगले गुण मिळतील याची कुठलीही शाश्वती नाही.
२०१५ मध्येही अशीच स्थिती होती. मागच्या सात चुकानंतरही प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांविरुद्ध सीबीएसईने कारवाईचे सूतोवाच केले नाही. २०१३ मध्येही पेपर अवघड होता आणि विद्यार्थ्यांनी त्याची तक्रार केली होती. अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक अन्य करिअरसाठीही गणित महत्त्वाचा विषय आहे. मात्र, ऐनवेळी प्रश्नपत्रिकेतील पॅटर्नमध्ये बदल करून मंडळ विद्यार्थ्यांसमोर अडचणी उभ्या करत आहे. चेन्नई मॅथमेटिकल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. करंदीकर या प्रकरणी म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षांतील पेपर शिक्षकही विशिष्ट वेळेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त सोडवू शकत नाहीत.
सीबीएसईच्या जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा म्हणाल्या, प्रश्नपत्रिका दीर्घस्वरूपाची निघत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. तज्ज्ञांनी तयार केलेल्या गुणांकन पद्धतीनुसार गुण दिले जातात. सीबीएसईने आतापर्यंत चौकशी समितीची स्थापना केली नाही.
दुसरीकडे एका सर्वेक्षणात दहावीत शिकणारे विद्यार्थी गणिताला घाबरत असल्याचे समोर आले आहे. १७ राज्यांतील विद्यार्थी या विषयात ३५ किंवा त्यापेक्षा कमी गुण मिळवतात, असे या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
राज्यांचे सरासरी गुण
> दिल्ली- 36
> गुजरात- 31
> हरियाणा- 35
> हिमाचल प्रदेश-32
> मध्य प्रदेश- 31
> महाराष्ट्र- 38
> राजस्थान- 34
> उत्तराखंड- 34
> चंदिगड- 34
> ओडिशा- 43
पुढील स्लाइड्सवर वाचा, मॉडेल टेस्ट पेपरपेक्षा एकदम वेगळी येते प्रश्नपत्रिका.... सर्वात जास्त विद्यार्थी होतात गणितात नापास... पंतप्रधानांना फेसबुक पेजवर समस्या सांगितली....१७ राज्यांत विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ३५ पेक्षा कमी