आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तारानंतरच ‘टीम’ शहाचा विस्तार; रहाटकरांना पुन्हा संधीची शक्यता कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमित शहा यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली असली तरी नवीन ‘टीम’चा चेहरा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अाकारास येईल. अमित शहांच्या नव्या टीममध्ये महाराष्ट्रातील नवीन चेहरा अपवादात्मक असेल.

यावर्षी आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीत तसेच २०१७ मध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, गोवा या राज्यांत निवडणुका आहेत हे लक्षात घेता येथील लाेकप्रतिनिधींना प्रथम मंत्रिमंडळात, संघटनेत स्थान देण्याची माेदी-शहांची रणनीती अाहे. शहांच्या कार्यकारिणीत महत्त्वाचा दलित चेहरा नाही. ती उणीव भरून काढली जाणार अाहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत विनय सहस्त्रबुद्धे, श्याम जाजू या दाेन्ही व्यक्ती मराठी अाहेत. सहस्त्रबुद्धे हे राज्यसभेवर गेल्यास उपाध्यक्ष म्हणून नवीन चेहरा येऊ शकताे. जाजू हे सुद्धा संसदेत जाण्यास उत्सुक अाहेत, परंतु त्यांची संघटनेतील पकड पाहता त्यांना नवीन टीम शहांचा भाग व्हावा लागेल. पूनम महाजन या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव अाहेत, परंतु त्यांचेही विशेष काम दिसून अाले नाही. मात्र, त्यांचे वक्तृत्व, संसदपटू म्हणून उदयास येत असल्याने त्यांचा संघटनेत उपयाेग केला जाणार अाहे.
रहाटकरांना पुन्हा संधीची शक्यता कमी
अाैरंगाबादच्या विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला माेर्चाच्या अध्यक्षा अाहेत. त्यांनी गेल्या दीड वर्षात चांगली कामगिरी बजावली. बचत गटासाठीचे त्यांचे प्रयत्न स्तुत्य अाहेत. माेदी अाणि अमित शहा हे त्यांच्या कामामुळे प्रभावित अाहेत, परंतु त्यांना नवीन टीममध्ये पुन्हा संधी मिळेलच याची खात्री नाही. उत्तर प्रदेशातील निवडणुका पाहता रहाटकर यांच्याकडून अध्यक्षपद जाण्याची शक्यता अाहे. असे झाल्यास त्यांना संघटनेत महत्त्वाचे स्थान दिले जाईल.