आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीबीएल : सिंधूच्या नेतृत्वात चेन्नई स्मॅशर्स टीम चॅम्पियन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिअाे अाॅलिम्पिकमधील राैप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली चेन्नई स्मॅशर्स टीम दुसऱ्या सत्राच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) चॅम्पियन ठरली. या टीमने फायनलमध्ये शनिवारी मुंबई राॅकेट्सचा पराभव केला. चेन्नईने ४-३ अशा फरकाने राेमहर्षक विजय संपादन करून किताबावर नाव काेरले. यामध्ये सिंधूच्या कुशल नेतृत्वाचे माेलाचे याेगदान ठरले. तिने महिला एकेरीच्या लढतीमध्ये बाजी मारून चेन्नईची विजयी अाघाडी कायम ठेवली. तिने संगूला ११-८, ११-८ अशा फरकाने धूळ चारली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, डाेपिंग : नरसिंगने नाेंदवला सीबीअायकडे जबाब....