आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DocossX1 हा स्मार्टफोन Freedom251 तर ठरणार नाही ना, वाचा 10 संशयास्पद बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात आणखी एख कंपनी स्वस्त स्मार्टफोनचे स्वप्न घेऊन ग्राहकांसमोर आली आहे. जयपूरच्या Docoss कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Docoss X1 लाँच केला आहे. या कपंनीने अवघ्या 888 रुपयांत फोन देण्याचा दावा केला आहे. पण या फोनची जाहिरात झळकल्यानंतर लगेचच डोळ्यासमोर काही दिवसांपूर्वी आलेल्या Freedom251 चे चित्र उभे राहिले. त्यावेळी ग्राहकांची मोठ्याप्रमाणावर निराशा आणि फसवणूक झाली होती, त्यामुळे यावेळीही तशी फसवणूक होण्याची भिती लोकांच्या मनात आहे.

फीचर्स
> Docoss कंपनीने केलेला दावा पाहता फिचर्सच्या बाबतीत हा स्मार्टफोन किमतीच्या तुलनेत चांगला असल्याचे समोर येत आहे.
> फोनचा डिस्प्ले 4 इंचाचा असेल.
> 1.2GHz चे प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे.
> फोनची इंटर्नल मेमरी 4 GB आहे ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते.
> या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल.

Freedom251 प्रकरण न्यायालयात
> यापूर्वी फ्रीडम 251 नावाच्या कंपनीने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या दाव्यामुळे चांगलीच चर्चा झाली होती.
> रिंगिंग बेल्स या कंपनीने 251 रुपयांत फोन देण्याचा दावा केला होता.
> पण या कंपनीवर धोकेबाजीचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या फोनच्या सत्यतेबाबत शंका येण्यामागची काही कारणे...