आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरी मुलांचा पॉकेटमनीवर वार्षिक २२ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च, 90% शहरी मुलांजवळ मोबाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील मुलांच्या पॉकेटमनीच्या खर्चाबाबत कार्टून चॅनल पोगोने केलेल्या सर्वेक्षणात अनेक बाबी समोर आल्या आहेत. ‘टर्नर न्यू जनरेशन- २०१६’ नावाच्या  सर्वेक्षणात सर्व मोठ्या शहरांचा  समावेश आहे. शहरातील प्रत्येक मुलगा दरवर्षी २२ हजार कोटी रुपये पॉकेटमनीवर उडवतो. ही रक्कम भूतान, मालदीव यासारख्या जगातील ५२ देशांच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त आहे. पोगोने २०१२ मध्ये हे सर्वेक्षण केले होते. २०१२ मध्ये प्रत्येक मुलास दर महिन्यास २७५ रुपये पॉकेटमनी मिळत हेाता. पाच वर्षांत तो दुप्पट होऊन ५५५ रुपये झाला. मुले ५०% पॉकेटमनीची बचतही करतात. बचत करणाऱ्यांमध्ये मुलींचे सर्वाधिक प्रमाण आहे. 
 
९०% शहरी मुलांजवळ मोबाइल, १४ वयापर्यंतची मुले आळशी
- सर्वेक्षणात केलेल्या दाव्यानुसार ९०% शहरी मुलांच्या हातात मोबाइल फोन व अन्य गॅजेट्स आहेत. ते याचा बराच वापर करतात.
- या गॅजेट्सचा सर्वात जास्त उपयोग गेम खेळण्यास, फोन करणे व संगीत ऐकणे, संदेश टाइप करणे, व्हिडिओ पाहण्यासाठी करतात.
- ३२% मुले अॅप्सही डाऊनलोड करतात. यामध्ये पैसे द्यावे लागणारे ७०% अॅप्स असतात.
 
असे हिरावले बालपण
- मोबाइल - टीव्हीमुळे मुलांची जीवनशैली बिघडत आहे. मुलांचा अनियमित आहार, भूक कमी लागणे व प्रकृती बिघडल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
- ७ ते १४ वयापर्यंतच्या मुलांचा मैदानी खेळ कमी झाला असून ते आळशी झाले आहेत.
- शहरांतील या वयाच्या मुलांचे ४८% पालक व ४ - ६ वयाच्या मुलांचे २९% पालक मुलांना ट्युशनला पाठवतात.
 
मुलांशीसंबंधित अहवाल
१७५ देशांचा अभ्यास, भारत मुलांच्या लठ्ठपणात दुसरा]
- चीनमध्ये १.५ कोटी मुले लठ्ठपणामुळे त्रस्त. भारत दुसऱ्या क्रमांकावर असून येथे १.४४ कोटी मुले लठ्ठ आहेत. अमेरिकेत १३% मुलांना याचा त्रास आहे.
- जंक फूड व बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात मधुमेह, रक्तदाब यासारख्ये विकार होतात.
- बांगलादेश व व्हियतनाममध्ये लठ्ठपणाचा दर एकूण लोकसंख्येच्या १% टक्के आहे. 
बातम्या आणखी आहेत...