Home »National »Delhi» News About China Has Warned India Doklam

डोकलाम वाद : संयमाचीही एक सीमा असते, भारताने भ्रमात राहू नये : चीन

वृत्तसंस्था | Aug 07, 2017, 15:19 PM IST

  • डोकलाम वाद : संयमाचीही एक सीमा असते, भारताने भ्रमात राहू नये : चीन
बीजिंग -सिक्कीम सेक्टरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या डोकलाम वादावर चीनने भारताला इशारा दिला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुआकियांग यांनी गुरुवारी म्हटले आहे की, ‘आजवर भारतासोबत आम्ही सद््भावनेची भूमिका अवलंबली आहे, मात्र आमच्या संयमाला मर्यादा आहेत. भारताने या प्रकरणातील भ्रम सोडून द्यावेत. या विभागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारताने लवकरच आणि योग्य रीतीने मार्ग काढावा. द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक शांततेचा विचार करून आम्ही संयम बाळगला आहे. परंतु या संयमाला एक सीमा आहे. सीमेचा अर्थ वेगळा काढू नका, असे चीनने म्हटले आहे. चीनने वाद मिटवण्यासाठी सैन्य मागे घेण्याची अट ठेवली आहे. तोडग्यासाठी भारत-चीन या दोन्ही देशांनी सैन्य मागे घेतले पाहिजे, असे भारताने म्हटले आहे.
इशारा देतानाच सीमेजवळ युद्धाभ्यास सुरूच
धमकीवजा वक्तव्ये करणाऱ्या चीनचा तिबेट सीमेजवळ युद्ध सराव देखील सुरू आहे. चिनी माध्यमांकडून जारी थेट प्रक्षेपणातून चिनी ताेफा व क्षेपणास्त्रे शत्रूचा नायनाट करण्याचा सराव करताना दिसतात.
म्हणे सैन्य हटवले..
उभय देशांच्या वादाचे कारण ठरलेल्या डोकलाममध्ये भारताने सैनिकांची संख्या ४०० हून ४० अशी केली आहे, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. मात्र त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी हा लष्करी मोहिमेचा विषय असल्याचे सांगून सविस्तर बोलणे टाळले.
म्हणे सैन्य हटवले..
उभय देशांच्या वादाचे कारण ठरलेल्या डोकलाममध्ये भारताने सैनिकांची संख्या ४०० हून ४० अशी केली आहे, असा दावा चीनकडून करण्यात आला आहे. मात्र त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी हा लष्करी मोहिमेचा विषय असल्याचे सांगून सविस्तर बोलणे टाळले.
अरूणाचलचा दावा बिनबुडाचा: चिनी तज्ज्ञ
बीजिंग - चीनचे रणनीतिचे विश्लेषक वांग ताआे ताआे यांनी अरुणाचल प्रदेशसोबत चीनच्या राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. हे राज्य देशासाठी विशेष महत्त्वाचे नाही किंवा देशाची संपत्ती देखील नाही. वास्तविक चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेट समजून दावा करत आला आहे. वांग यांनी जहीहू डॉट कॉमवर एक लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, भारत-चीन यांच्यातील सीमावाद निरर्थक आहे. कारण दोन्ही देशांसाठी या प्रदेशात विकास करणे कठीण आहे. किंबहुना आर्थिक, राजकीय व व्यवस्थापनाच्या पातळीवरही या प्रदेशात अडचणी आहेत.

Next Article

Recommended