आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमाधारकांच्या तक्रारी दोन टक्क्यांनी वाढल्या, आक्षेपांतही वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली - आरोग्य विमाधारकांच्या तक्रारींत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरोग्य विमाधारकांनी सुमारे २५ हजार ६०० तक्रारी नोंदवल्या. तक्रारींचे हे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले आहे.

जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या (जीआयसी) मते एकूण तक्रारींपैकी ४४ टक्के अर्थात सुमारे ११ हजार दाव्यांचे सेटलमेंटविषयी होत्या. एक वर्षापूर्वी क्लेम सेटलमेंटसंबंधीच्या सुमारे १० हजार तक्रारी आल्या होत्या. अर्थात त्यात आता १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पॉलिसीविषयीच्या तक्रारीही ६ हजाराहून ७ हजारावर पोहचल्या आहेत. २६ टक्क्यावरून त्या २९ टक्क्यांवर पोहचल्या आहेत. गैर-जीवन विमा उद्योगात सुमारे २५ टक्के आरोग्य विमा प्रीमियमद्वारे येतो. वाढत्या तक्रारींमागे ग्राहकांकडील माहितीचा अभाव हे कारण असल्याचे कंपन्यांना वाटते. जीआयसीचे सरचिटणीस आर. चंद्रशेखरन यांच्या मते ग्राहकांना विम्याच्या नियम आणि अटी योग्य प्रकारे समजत नसल्यामुळे अशा तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी आरोग्य विमा कंपन्यांचा व्यवसाय ४० टक्क्यांनी वाढला आहे. दुसरीकडे जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या व्यवसायातही २५-३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गत आर्थिक वर्षात गैर-जीवन विमा क्षेत्रात एकूण १२.६० कोटी पॉलिसी होत्या. तुलनेने त्यात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

देशातील १३ शहरांत नेमले जाणार ‘पर्यटक मित्र’
पर्यटकांच्या मदतीसाठी पर्यटक मित्रांची नेमणूक करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात देशातील १३ शहरात स्वयंसेवकांची नेमणूक होईल. १२ जानेवारी रोजी ही योजना सुरू होणार आहे. युवा दिनाच्या निमित्ताने त्याची सुरुवात होईल. राष्ट्रीय छात्र सेवेच्या तरुणांना यामध्ये संधी देण्यात येणार आहे. या पर्यटक मित्रांना ८ तासांसाठी काम करावे लागेल. दहा दिवस त्यांना हे काम करता येईल. सेवेबद्दल शालेय विद्यार्थ्यांना पर्यटन विभागाकडून प्रशस्तिपत्रदेखील मिळणार आहे. अजमेर, अमृतसर, अमरावती, द्वारका, गया, कामाख्या, कांचिपुरम इत्यादी शहरांचा योजनेत समावेश आहे.

मोटार इन्शुरन्समधील तक्रारी कमी, क्लेम सेटलमेंटमध्येही घट
- गैर जीवन विमा व्यवसायात २५ टक्के भागीदारी आरोग्य विमा आणि ४० टक्के मोटार विम्याची आहे.
- आरोग्य विम्याच्या तुलनेत मोटार विम्यातील तक्रारींत घट झाली आहे. या सेगमेंटमध्ये दाव्यांचे सेटलमेंट ०.१४ हून ०.१० टक्क्यांवर आले आहे.
- गतवर्षी मोटार विम्याची २४, ६४७ दाव्यांचा निपटारा झाला.
- वर्षभरात ही संख्या २८ हजारांवर पोहोचली होती. अशा प्रकारे या क्षेत्रात सुमारे ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
- सुमारे ४७ % तक्रारी दाव्यासंबंधी, ३३% पॉलिसीशी संबंधित.