आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अाल्यासच अच्छे दिन, नोटबंदीच्या मुद्द्यावरून राहुल यांची पुन्हा मोदी सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर प्रहार कायम ठेवत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीकास्त्र सोडले. अत्यंत वाईट निर्णयामुळे जगभरात पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांवर टीका होत आहे. २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरच ‘अच्छे दिन’ परत येतील, असे राहुल म्हणाले.

नोटबंदीविरुद्ध काँग्रेसच्या जनवेदना परिषदेत बोलताना राहुल म्हणाले की, पहिल्यांदाच जगभर भारताच्या पंतप्रधानांवर टीका होत आहे. मोदींच्या या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था १६ वर्षे मागे गेली आहे. ऑटोमोबाइल विक्रीत देशभर मोठी घसरण झाली आहे.

 अडीच वर्षांतच भाजपने आरबीआय व न्यायपालिकेसारख्या संस्थांना लक्ष्य केले. ७० वर्षांत काँग्रेसने असे कधीच केले नाही.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकांमध्ये भितीचे वातारवण निर्माण करत आहेत, असे सांगतानाच काँग्रेसच त्यांच्या विचारसरणीचा पराभव करेल आणि भाजपला सत्तेतून उखडून फेकून देईल. लोकांना भयमुक्त व्हा, असे काँग्रेस सांगते तर भाजपची विचारसणी मात्र लोकांमध्ये भिती निर्माण करणारी आहे, असे राहुल म्हणाले.
 
राहुल पार्ट टाइम नेते : भाजप
नोटबंदीवर राहुल गांधींची टीका ही गरिबांचे दु:ख नसून त्यांचे वैयक्तिक दु:ख आहे. ते पार्ट टाइम नेते आहेत. राहुल गांधींना नैराश्याने ग्रासले आहे. ते मोदींविरुद्ध वारंवार तेच बोलत आहेत, मात्र देशातील जनता त्यांचे ऐकायला तयार नाही, अशी टीका भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...