आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरच्या स्थितीसाठी मोदी जबाबदार : राहुल गांधी, भाजपचा पलटवार- दहशतवाद्यांवर चुप्पी का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमधील सातत्याने वाढत असलेल्या दहशतवादी घटनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणेच जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला. यावर भाजपने म्हटले आहे, की राहुल गांधींनी सुटीवरुन आल्यानंतर मोदींवर तर निशाणा साधला मात्र दहशतवाद्यांवर ते काही बोलले नाही. 
 
राहुल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मोदींच्या धोरणांमुळे काश्मीरमधील दहशतवाद वाढला आहेत. रणनीतिक स्तरावर देशासाठी हा मोठा धक्का आहे.’ मोदींनी देशाची काळजी न करता काश्मीरमध्ये राजकीय फायद्याला महत्त्व दिले आहे. त्यांनी पीडीपीशी राजकीय लाभासाठी हात पुढे केला. 
 
त्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले की, पीडीपी-भाजप युती म्हणजे मोदींसाठी खासगी फायदा आहे. त्यामुळे देशातील निर्दोष लोकांचे रक्त सांडत आहे.
बातम्या आणखी आहेत...