आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईकच्या वक्तव्यांची हाेणार कसून चौकशी, भाषणांच्या सीडी तपासणार : राजनाथसिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘पीस’टीव्हीवरून दहशतवादाबद्दल आक्षेपार्ह विधाने करणारा धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या वक्तव्याच्या सीडींची कसून तपासणी केली जात असल्याचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. ‘पीस’टीव्हीच्या भारतातील प्रसारणाबाबतही केंद्राने गंभीर पावले उचलली असून या वाहिनीसह प्रसारणाची परवानगी नसलेल्या इतर वाहिन्यांच्या डाऊनलिंकचीही चौकशी सुरू झाली आहे. माहिती-प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंंडेशनला परदेशातून मिळणाऱ्या निधीचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. पीस टीव्हीवरून जगभरातील मुस्लिमांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केल्याचा आरोप झाकीरवर आहे. ‘पीस’ टीव्हीसह अशा वादग्रस्त २४ दूरचित्रवाहिन्यांवर २०१२ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने बंदी घातली होती. तरीही काही वाहिन्यांचे प्रसारण सुरूच होते. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, गृहमंत्री राजनाथसिंह व मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांच्या भेटीबाबत ट्विट करून या भेटीबद्दल काय म्हणाल, असा प्रश्न दिग्विजय यांनी आपल्याबाबत पोस्ट टाकणाऱ्यांना विचारला.
दिग्विजयसिंह वादात
शुक्रवारी सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात झाकीर व दिग्विजयसिंह एका व्यासपीठावर होते. या वेळी दिग्विजय झाकीर याची स्तुती करून त्याला शांतिदूत संबोधत असल्याचे दिसत होते. ढाक्यात गेल्या शुक्रवारी एका भारतीय तरुणीसह २२ जणांचे प्राण घेणाऱ्या हल्ल्यातील दहशतवादी झाकीर याच्या उपदेशांतूनच प्रभावित झालेले होते, असे आता चौकशीत स्पष्ट होत आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...