आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर गुन्हेगारीत वाढ, देशात हजारो तक्रारी, रविशंकर प्रसाद यांची संसदेत माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात २०१४ पासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढले आहे. देशभरात यासंदर्भातील ९ हजार ६२२ तक्रारी दाखल झाल्या आहेत, अशी माहिती सरकारने
शुक्रवारी संसदेत दिली.

केंद्र सरकारकडे सध्या केवळ सायबर गुन्हेगारीची एक संख्या आहे. परंतु ऑनलाइन फसवणूक, शॉपिंग पोर्टल्सकडून होणारी लुबाडणूक इत्यादी गुन्हेगारीची वर्गवारी उपलब्ध नाही, असे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले. ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीवर त्यानुसार तपास केला जाईल. या क्षेत्रातील गुन्हेगारी रोखणे आणि माहिती सुरक्षेसाठी सरकारने एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी सुमारे ९८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात देशातील ५१ संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, अजुनही तपास यंत्रणेला सायबर गुन्हेगारीच्या छड्यात यश नाही.
१ लाख लोकांना प्रशिक्षण
माहिती तंत्रज्ञान सुरक्षेच्या पातळीवर सरकारने १ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्याचबरोबर १३ हजार सरकारी कर्मचाऱ्यांमध्येही माहिती तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसंबंधी जागृती करण्यात येणार आहे, असे सरकारकडून राज्यसभेत सांगण्यात आले आहे.