आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएएस अधिकाऱ्याचा बुडून मृत्यू, पोहण्यात निष्णात होते, कुटुंबीयांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - सहकारी महिला अधिकाऱ्याला वाचवताना एका आयएएस अधिकाऱ्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. अाशिष दहिया असे या (३०) अधिकाऱ्याचे नाव असून २०१६ च्या तुकडीचे ते अधिकारी होते. 
 
मूळ सोनिपतचे असलेले दहिया यांनी नुकतेच मसुरीच्या आयएएस अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण केले होते आणि १ जूनपासून श्रीनगरमध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार होते. सोमवारी दिल्लीच्या बेससरायमधील जलतरण तलावात काही आयएएस अधिकाऱ्यांची पार्टी सुरू होती. दरम्यान, एक महिला अधिकारी तलावात पडली. तिला  वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांसह आशिष यांनी उडी घेतली. महिलेला सुरक्षित बाहेर काढले. पण काही वेळानंतर आशिष तलावात तरंगत्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी मद्यप्राशन केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे, तर आशिष हा चांगला जलतरणपटू होता. त्याने हिमाचलचे भाक्रानांगल पोहून पार केले होते, असे  कुटुंबीयांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...