आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल मानहानीचा खटला: राम जेठमलानींनी केली अरुण जेटली यांची उलटतपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे कायदामंत्री राहिलेल्या दोन्ही दिग्गज वकिलांमध्ये सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात जोरदार सामना झाला. या भूमिकेत आहेत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी भाजप नेते राम जेठमलानी. निमित्त होते जेटलींद्वारे दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या १० कोटी रुपयांच्या मानहानी खटल्याच्या सुनावणीचे. केजरीवालांचे वकील जेठमलानींनी भर न्यायालयात जेटलींची उलटतपासणी केली. 

जवळपास तीन तास सुरू असलेल्या चर्चेत जेठमलानी मानहानीच्या दाव्याला निराधार सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते. जेटलींनी म्हटले की, त्यांच्या प्रतिष्ठेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर दूर दूरपर्यंत मोजणे, त्याचा अंदाज लावणे कठीण आहे. यावर जेठमलानींनी म्हटले की, आपण स्वत:ला महान मानता आहात. तिखट, तिरकस प्रश्नांवर तर अनेकदा जेटली भावुक झाले. जेटलींच्या वकिलांची अनेकदा जेठमलानींशी वादावादी झाली. न्यायालयाच्या जॉइंट रजिस्ट्रारना मध्ये पडून प्रकरण शांत करावे लागले. वाचा सोमवारी झालेल्या सुनावणीचा लाइव्ह रिपोर्ट.....  
 
 देशाचे कायदामंत्री राहिलेले आहेत दोन्ही नेते, भाजपतही कधीकाळी होते एकमेकांच्या बरोबर
 
जेटली म्हणाले, माझ्या प्रतिष्ठेला बसला धक्का, भरपाई मोजणे तर कठीणच
जेठमलानी म्हणाले, अच्छा! आपण एवढे महान आहात!!
 
-    जेठमलानी : साख किंमत तर दान करणाऱ्या ठगाचीही बनते. आपण १० कोटी कसे ठरवले, कसे मोजले?  जेटली - हा तर मला पोहोचलेल्या नुकसानीचा फारच लहान भाग आहे. उच्च न्यायालयाच्या जॉइंट रजिस्ट्रार रूममध्ये सुनावणी दुपारी साडेबारा वाजता सुरू झाली. जेठमलानींनी जेटली यांना एकूण ५२ प्रश्न विचारले. जॉइंट रजिस्ट्रार अमितकुमार यांनी यातील ३० प्रश्न खटल्याशी संबंधित असल्याचे मान्य केेले. तथापि, ९ प्रश्न अयोग्य ठरवले. जेटलींच्या बाजूने वकील प्रतिभा सिंह, माणिक डोगरा व अन्य उपस्थित होते.  
 
-    जेटलींचे वकील :  आमच्या अशिलाविरुद्ध माध्यमांनी आरोप लावले आहेत की, संसदेतही अनेक प्रश्न उचलले. यामुळे त्यांच्या प्रतिमेला व प्रतिष्ठेला नुकसान पोहोचले आहे. जेटलींच्या खंडन करण्याच्या नंतरही ५ दिवस सातत्याने असे होत राहिले. त्यांच्या प्रतिष्ठेला पोहोचलेल्या नुकसान भरपाईची मोजदाद शक्य नाही.   
 
-    जेठमलानी :  आपण ६ दिवस का वाट पाहिली? शेवटी ७ व्या दिवशीच का मानहानीचा खटला केला?  
 
-    जेटलींचे वकील :  ते वाट पाहत होते.  जेठमलानींनी वारंवार हाच प्रश्न विचारला. यावर जेटलींच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला.  
 
-    जेठमलानी :  हे आपण कसे ठरवले की जी मानहानी झाली आहे, त्याची भरपाई आर्थिक स्वरूपात होऊ शकते? आणि ही मानहानी १० कोटींचीच आहे? काय आपले यामुळे कोणते आर्थिक नुकसान झाले आहे काय? जर हो, तर कसे?  
 
-    जेटली :  मानहानीची भरपाई आर्थिक स्वरूपात केली जाऊ शकत नाही. कुटुंब, मित्र वा समाजामध्ये माझे जे महत्त्व आहे, त्या आधारावर मी १० कोटींचा दावा ठोकला आहे. अशा आरोपांमुळे मी फारच त्रस्त होतो. आरोप वारंवार माध्यमातून दाखवले गेले. यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे.   
 
-    जेठमलानी : हे सांगण्यासाठी काय आधार आहेत की प्रतिष्ठेला पोहोचलेली ठेच याची भरपाई होऊ शकत नाही आणि न की त्यास मोजले जाऊ शकत नाही. काय हे प्रकरण स्वत:ला महान समजण्याचे तर नाही ना? सन्मान आणि प्रतिष्ठेत काय अंतर आहे? (ऑक्सफर्ड व वेबस्टर डिक्शनरीचा उल्लेख करताना) एक जण लोकांना फसवून पैसे कमावतो आहे. यातील काही दोन करून टाकतो. आपल्या याचिकेमागे काही तर्कसंगत कारण दिसत नाही, याशिवाय की आपण स्वत: आपल्याबाबत असा विचार करता.   
 
-    जेटली :    प्रतिष्ठेला झालेल्या नुकसानीची किंमत लावली आहे, ती माझ्या झालेल्या नुकसानीचा फारच लहान भाग आहे.  
 
-    जेठमलानी :  जेटलींना कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाहीये. यासाठी ते म्हणत आहेत की यास मोजले जाऊ शकत नाही.  
 
-    जेटली :  माझ्या प्रतिष्ठेला पोहोचलेली ठेच काही मर्यादेपर्यंत किमतीत मोजली जाऊ शकते. सन्मान हरवल्यावर व्यक्ती तणावग्रस्त होतो. माझ्याबरोबरही हेच झालेले आहे. माझे पद, पार्श्वभूमी आणि प्रतिष्ठा यास पाहिले तर माझ्या सन्मानास एवढे मोठे नुकसान झाले की त्यास मोजूच शकत नाही.  
 
-   जेठमलानी : म्हणजे आपले हे मत आहे की, आपण इतके महान आहात की यास आर्थिक स्वरूपात मोजू शकत नाही.  
-    जेठमलानी :  आपण याचिकेत लिहिले आहे की, आपल्या अधिकारांवर अतिक्रमण झाले ते कसे?  
 
-    जेटली :  प्रतिमा मलिन करण्यासाठी माझ्याविरुद्ध सातत्याने मोहीम चालवली गेली. यास थांबवणे आ‌वश्यक होते. यासाठी मानहानीचा खटला दाखल केला. (भावुक होत आपल्या संपूर्ण राजकीय करिअरमध्ये राजकीय टीकेवर कधीही मी काही बोललो नाही. पण या वेळी मला खटला दाखल करावा लागला, कारण की माझा सच्चेपणा आणि निष्ठांवरच प्रश्न निर्माण झाला होता. मी १९७७ पासून वकिली पेशात आहे, राज्यसभेत विरोधी पक्षनेता राहिलो आहे. समाज, कुटुंब आणि मित्रांमध्ये माझी प्रतिमा स्वच्छ आहे.  
 
-    जेठमलानी :   राजेंद्रकुमार यांच्या कार्यालयावरील छाप्याची आपल्याला माहिती होती का?  
 
-    जेटली :  नाही, मला माध्यमांच्या अहवालातून कळले होते की, दिल्ली सचिवालयात(मंत्रालयात) माजी मुख्य सचिव राजेंद्रकुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. पण केजरीवालांनी आरोप लावला की हे माझ्या सांगण्यावरून झाले आहे.  
 
-    जेठमलानी :  काय आपल्याला माहीत होते की डीडीसीएशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात होती?  
 
-    जेटली :  मला याची माहिती नव्हती. छाप्यानंतर केजरीवाल आणि इतरांनी डीडीसीएसंबंधी माझ्याविरुद्ध मानहानीकारक विधाने केली. त्यांचा उद्देश छाप्यांवरून लक्ष इतरत्र वळवून कशाही प्रकारे मला वादामध्ये ओढावयाचा होता. तथापि, माझे या वादाशी काहीही घेणे-देणे नव्हते.   
 
-    जेठमलानी :  नोकरशह चेतन साघी यांच्या देखरेखीत अहवाल तयार झाला होता? आपली त्यांच्याशी मैत्री आहे ना?  
 
-    जेटली :  मनासारख्या अहवालासाठी कधीही कोणतीही बैठक झाली नाही की असा कोणताही दबाव टाकला नाही.  
(सुनावणी मंगळवारीही सुरू राहील)  
 
प्रधान सचिवांवरील छाप्यानंतर केजरीवाल यांनी केले होते आरोप 
सीबीआयने डिसेंबर २०१५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. तेव्हा केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक नेत्यांनी डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबाबत थेट अरुण जेटलींवर आरोप केले होते. जेटली २०१३ पर्यंत डीडीसीएचे अध्यक्ष होते. त्यानंतर जेटलींनी केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त ‘आप’चे नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चड्ढा आणि दीपक वाजपेयी यांच्यावर १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...