आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सून अपत्य आहे की सासरची नातेवाईक? दिल्ली उच्च न्यायालय देणार निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पालकांचा सांभाळ करण्याच्या कायद्यानुसार करण्यात आलेल्या तक्रारीवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  सुनेला सासरच्या लोकांनी निष्कासित केले तर ती अपत्य समजली जाते की नातेवाईक? या मुद्द्यावर निर्णय देणार आहे.  

अपत्याच्या नावावर संपत्ती नसेल तर आईवडील त्यांच्या घरातील दुर्व्यसनी मुलास घरातून हाकलून देऊ शकतात, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाच्या आधारे आईवडील आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा २००७ नुसार स्थापन करण्यात आलेल्या लवादाने सासूच्या याचिकेवरून सुनेला सासरहून काढून देण्याचे आदेश दिले होते. त्या महिलेने या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण सुनावणीसाठी न्या. संजीव सचदेवा यांच्यासमोर आले. त्यावर त्यांनी ३१ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत लवादाच्या निर्णयास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने महिलेचा पती आणि सासूला नोटीस पाठवून उत्तर देण्यास सांगितले आहे.  

याचिकेत म्हटले आहे की...
ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार सून ‘अपत्य’ किंवा  नातेवाईक या व्याख्येत बसत नाही. कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार  पती व सासू घरातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी तक्रार त्या महिलेने याचिकेत केली आहे.
बातम्या आणखी आहेत...