आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम नव्हे, आम्हीच पराभवास जबाबदार; चुका केल्याची अरवींद केजरीवालांची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पक्षांतर्गत विरोध वाढू लागल्याने दबावापोटी माघार घेतली - Divya Marathi
पक्षांतर्गत विरोध वाढू लागल्याने दबावापोटी माघार घेतली
नवी दिल्ली- निवडणुकीत सातत्याने पराभवास तोंड द्यावे लागणाऱ्या आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी भूमिका मांडली. आमच्या काही चुका झाल्या आहेत. ही बहाणेबाजी करण्याची नव्हे तर आत्मचिंतनाची वेळ आहे, असे केजरीवाल यांनी ट्विटरवरून पत्राद्वारे कबूल केले.  

केजरीवाल यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट करून माघार घेत चुका कबूल केल्या. आतापर्यंत केजरीवाल यांनी पंजाब, गोवा विधानसभा व राजौरी गार्डनच्या पोट निवडणुकीतील पराभवासाठी ईव्हीएम जबाबदार असल्याचा आरोप लावला होता. परंतु दिल्लीतील महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या तिसऱ्या दिवशी एक पत्र जारी करून भावना व्यक्त केल्या. गेल्या दोन दिवसांत मी अनेक कार्यकर्ते, मतदारांशी चर्चा केली. त्यांच्याकडून मला सत्य समजले. आम्ही चुका केल्या हे सत्य आहे. आत्मचिंतन करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. चुका स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यांना दुरुस्त करूया. बहाणेबाजी करायची नव्हे तर कृतीची गरज आहे. आपल्याला पुन्हा कामाला लागावे लागेल. मात्र आपली वेळोवेळी घसरण झाली. परंतु स्वत:ला आेळखणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीला केवळ ४८ जागा मिळाल्या होत्या. भाजपला १८१ जागी विजय मिळाला होता.  
 
पुढील स्लाईडवर वाचा,
- पराभव जनतेने केला ईव्हीएमने नव्हे: विश्वास
- ‘अण्णा भाजपचे एजंट’,  वादग्रस्त पोस्टची चर्चा
- अनेक चुका केल्या, त्यांनी आता माफी मागावी : तिवारी
 
 
बातम्या आणखी आहेत...