आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात फटाक्यांच्या स्फोटानंतर घबराट, अॅम्ब्युलन्स, बाॅम्ब निकामी पथक घटनास्‍थळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या साकेत न्यायालयात गुरुवारी गोंधळ आणि दहशत निर्माण झाली होती. परिसरातील एका तळघरात झालेल्या स्फोटाच्या आवाजाने भीती निर्माण झाली होती. एवढेच नव्हे, तर वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या, दोन अॅम्ब्युलन्स आणि बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी रवाना झाले; परंतु नंतर तळघरात कोणी तरी फटाके फोडले व त्यामुळे स्फोटासारखा आवाज झाल्याचे स्पष्ट झाले.
हा खोडसाळपणा कोणी केला, याचा तपास पोलिस करत असले तरी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास मात्र पोलिस यंत्रणा हादरली होती. त्याच वेळी स्फोटाची माहिती मिळाल्याने पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. खबरदारीचा उपाय म्हणून दोन अॅम्ब्युलन्सदेखील पाठवण्यात आल्या होत्या. सोबतच बाॅम्ब निकामी पथकही दाखल झाले होते. स्फोटाच्या आवाजानंतर काही वकिलांनी पोलिसांना त्याची माहिती कळवली होती. प्राथमिक तपासात हा फटाक्यांचा आवाज असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी काही फटाके जप्त केले.