आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डास चावल्याने मृत्यू झाल्यास आता दुर्घटना विम्याचा लाभ; राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डास चावल्यामुळे झालेल्या आजाराने मृत्यू झाल्यास आता दुर्घटना विम्याचा लाभ मिळेल. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने एका प्रकरणाची सुनावणी करताना हा निर्णय दिला.  

कोलकाता येथील मौसमी भट्टाचारजी यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाचे न्यायमूर्ती व्ही. के. जैन म्हणाले की, डास चावल्याने होणारा मृत्यू म्हणजे दुर्घटना नाही, असे मानणे कठीण आहे. डास चावावा आणि मलेरिया व्हावा, असे लोकांना वाटत नाही. विमा कंपन्यांच्या संकेतस्थळांवर असलेल्या माहितीनुसार, साप चावणे. कुत्रा चावणे आणि थंडीमुळे होणारा मृत्यू यासारख्या घटना दुर्घटना आहेत. त्यामुळे डास चावल्याने होणारे आजारही दुर्घटनाच मानले जावेत.  मौसमी भट्टाचारजी यांचे पती देवाशिष यांचा २०१२ मध्ये मलेरियाने मृत्यू झाला होता. जिल्हा ग्राहक मंच आणि पश्चिम बंगाल ग्राहक आयोगात त्यांच्या बाजूने निकाल झाल्यानंतरही विमा कंपनीने त्यांना क्लेम दिला नाही. कंपनीने राष्ट्रीय ग्राहक आयोगात याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय आयोगानेही आता मौसमी यांच्या बाजूनेच निकाल दिला.
बातम्या आणखी आहेत...