आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूतावासही डेंग्यूच्या विळख्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीमध्ये डेंग्यूचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत सुमारे ४ हजार नागरिक या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. पाकिस्तान, कॅनडा, जर्मनी, अमेरिका, ब्रिटनसह अन्य अनेक देशांच्या दूतावासातील सुमारे २० सदस्य आणि कर्मचाऱ्यांनाही डेंग्यूने आपल्या तावडीत ओढले आहे.
मंगळवारी १४ वर्षीय शिव दुबे या बालकाची आणि २४ वर्षीय रामबाबू या युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. यासोबतच राजधानीत डेंग्यूच्या मृतांची संख्या आता २५ वर पोहोचली आहे. आठवडाभरात दिल्लीत डेंग्यूचे १ हजार ९१९ रुग्ण आढळले आहेत.