आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डर्टी पिक्चर: पश्तून महिलांवर पाक लादतोय देह व्यापार, लाहोरमध्ये डांबले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकार पश्तून महिलांना देह व्यापार करण्यास भाग पाडत आहे, असा खळबळजनक आरोप पश्तून समाजाशी संबंधित कार्यकर्त्याने केला आहे. अशा महिलांना दहशतवादी अड्ड्यांवर पुरवल्या जात अाहेत.
 
उमर दौड खट्टाक या पश्तूनच्या सामाजिक कार्यकर्त्याने पाकिस्तान सरकारवर आरोप केला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने स्वात व वझिरिस्तानातील पश्तून समुदायातील असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त केली आहेत. स्वात व वझिरिस्तानमधील मुलींना लाहोरमध्ये सेक्स गुलाम म्हणून बळजबरीने जगण्याची वेळ आली आहे, असा दावा उमर यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कुकर्माची नवी कहाणी जगासमोर आली आहे. पाकिस्तानच्या फौजेने शेजारी राष्ट्र असलेल्या भारतात घुसखोरांना सर्रास जाण्याची परवानगी देतात. अनेकदा सैन्याकडून प्रशिक्षण घेऊन घुसखोर भारतात घुसतात. आता देशातील महिला, मुलींच्या अब्रूवरच सैन्याने घाला घातला आहे. त्यामुळे संवेदनशील नागरिकांतून संताप व्यक्त झाला आहे. उमर यांचे कुटुंबदेखील अफगाणिस्तानात राहते. तेथे राहूनच ते समुदायासाठी काम करतात. शनिवारी त्यांनी प्रसारमाध्यमांसमाेर पाकिस्तानचा आणखी एका क्रूर चेहरा जगासमोर आणला.  

पाकिस्तानी तालिबानकडून छळ  
पाकिस्तानातील तिसऱ्या सर्वात मोठ्या मूळ समुदायांमध्ये पश्तूनचा समावेश होतो. पाकिस्तानी तालिबान संघटनेने सात वर्षांपासून पश्तून समुदायाचा अनन्वित छळ केला आहे. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानी लष्कर तर समुदायाच्या जिवावर उठले. सैन्याने पश्तून समुदायाच्या घरांवरून बुलडोझर चालवले. बाजारपेठेची लूट केली. महिलांवर अत्याचार करण्यात आले.   
 
लाखो नागरिकांनी केले पलायन  
संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क संघटनेच्या आकडेवारीनुसार प्रदेशातील सुमारे ५ लाख नागरिकांनी अन्यायाला कंटाळून अफगाणिस्तानात आश्रय घेतला आहे. ही माहिती पाकिस्तान सरकारने जगासमोर येऊ दिलेली नाही. मीडियाही त्यापासून दूर आहे. 
 
पाकिस्तानच्या विरोधात स्वतंत्र सैन्य दल  
पाकिस्तानने आतापर्यंत पश्तूनच्या जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केले आहे. आता पश्तूनचे स्वतंत्र सैन्य दलाची स्थापना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पाकिस्तानच्या विरोधातील हे सैन्य दल लवकरच सक्रिय होईल. हे सैन्य दहशतवादाचा अंत करेल, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते उमर यांनी दिली.  
 
अनेक मुलींचे अपहरण करून डांबले : पाकिस्तानने शेकडो मुलींचे अपहरण करून त्यांना लाहोरमध्ये डांबून ठेवले आहे, असा दावा उमर यांनी केला आहे. स्वात व वझिरिस्तानमधून या मुलींचे अपहरण करण्यात आले आहे.  
 
‘दिशाभूल खूप झाली, आता सहन करणार नाही’  पश्तूनच्या जनतेची पाकिस्तानने आजवर दिशाभूल केली आहे. नागरिकांना मूर्ख ठरवले आहे. म्हणूनच आता आम्ही या गोष्टी सहन करणार नाही, अशी भावना प्रदेशात आहे.