आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीदरम्यान बेकायदा पद्धतीने जुन्या नोटा बदलण्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने अॅक्सिस बँकेचे अधिकारी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यानुसार संचालनालयाने ही कारवाई केली.   

आरोपपत्रात अॅक्सिस बँकेच्या कश्मिरी गेट शाखेच्या दोन अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आले. यात शाखेचे प्रमुख विनीत गुप्ता आणि ऑपरेशनल हेड शोभित सिन्हा यांचा समावेश आहे. नोटाबंदीच्या काळात ४० काेटी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 
दोन्ही अधिकारी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, अॅक्सिस बँकेचे हे अधिकारी नोटा बदलण्यासाठी सोने घेत होते. त्यांनी राजीव एस. कुशवाहा या व्यक्तीच्या ४० कोटी रुपयांच्या जुन्या नोटा नवीन करून दिल्या होत्या. कुशवाहा अनेक फर्म आणि कंपन्या चालवतात. नोटाबंदीच्या काळात ते कमिशन घेऊन जुन्या नोटा बदलून देत होते. नोटा बदलण्यासाठी त्यांनी अनेकदा सोने घेतले आणि आरटीजीएसद्वारे त्यांनी पैसे ट्रान्सफर केले.
   
दिल्ली पोलिसांनी सर्वात पहिले हे प्रकरण उघडकीस आणले होते. तपासणीदरम्यान ३.७ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांसह मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अॅक्सिस बँकेच्या बाहेर तीन लोकांना पकडण्यात आले होते. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने बेहिशेबी मालमत्तेची तपासणी सुरू केली होती.   
 
 
बातम्या आणखी आहेत...