आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपली परीक्षा उत्तीर्ण नाही, तरी विदेशी पदवीमुळे होणार डॉक्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- परदेशातून मेडिकलचे शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी आता कुठल्याही परीक्षेशिवाय देशात प्रॅक्टिस सुरू करू शकतील. याउलट, देशातील संस्थांतून एमबीबीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) मध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. एकच शिक्षण, एकच पदवी, पण वेगवेगळी तरतूद यामुळे विरोध सुरू झाला आहे. विदेशी पदवी घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आधीपासून सुरू असलेली एकमेव परीक्षाही होणार नाही, तर देशातच राहून सुमारे १४ परीक्षा (एमबीबीएसदरम्यान) उत्तीर्ण करून डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणखी एका परीक्षेचे ओझे लादण्यात आले आहे. द इंडियन मेडिकल कौन्सिल (अमेंडमेंट) बिल-२०१६ चा आराखडा लवकरच संसदेत सादर केला जाईल. त्याला विरोध होण्याची तीन कारणे अशी : एक : रशिया, जर्मनी आणि चीनसह अनेक देशांच्या संस्थांत परीक्षा न देतात प्रवेश मिळालेले विदेशी पदवीधारक विद्यार्थी कुठल्याही एक्झिट टेस्टशिवाय प्रॅक्टिस करू शकतील.
 
दुसरे : आतापर्यंत विदेशी पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन द्यावी लागते. त्यानंतरच ते देशात प्रॅक्टिस सुरू करू शकतात. गेल्या तीन वर्षांत फक्त १९% विद्यार्थीच ती उत्तीर्ण होऊ शकले. म्हणजे या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थीही आता डॉक्टर होऊ शकतील.

तिसरे कारण सर्वात महत्त्वाचे. ड्राफ्टनुसार पीजी कोर्सेसमध्ये प्रवेश आणि केंद्रीय आरोग्या सेवांत नियुक्तीसाठीही नेक्स्ट हेच एकमेव माध्यम असेल. म्हणजे जे विद्यार्थी त्यात उत्तीर्ण होणार नाहीत, ते प्रॅक्टिसही करू शकणार नाहीत आणि त्यांना पीजी कोर्सलाही प्रवेश मिळणार नाही. द इंडियन मेडिकल कौन्सिलच्या या निर्णयामुळे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या शिक्षणाच्या स्तरावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

या निर्णयाच्या विरोधात आयएमएने एमसीआयला पत्र लिहून फेरविचार करण्यास सांगितले आहे. नीट-२ च्या आंदोलनाशी संबंधित डॉ. अमित गुप्ता यांनी सांगितले की, हा ड्राफ्ट लागू झाला तर त्यामुळे जे डॉक्टर भारतीय संस्थांची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाहीत असे डॉक्टरही प्रॅक्टिस करू शकतील. आयएमएचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांच्यानुसार, अनेक विदेशी संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश चाचणी न घेताच प्रवेश दिला जातो. चीनच्या काही संस्थांत तर विद्यार्थ्यांना स्थानिक चिकित्सा पद्धतीच्या शिक्षणाआधारेच एमडीपर्यंतची पदवी दिली जाते. 

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. प्रवीणलाल कुट्टीचिरा म्हणाले की, एमबीबीएसच्या शिक्षणादरम्यान  सामान्यपणे १४ परीक्षा द्याव्या लागतात. एक्झिट एक्झामच्या अनिवार्यतेमुळे त्यांच्यावर आणखी परीक्षेचे ओझे वाढेल.
 
 
बातम्या आणखी आहेत...