आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे मुलांनी लग्नानंतर स्थलांतरीत होण्याची घातली जाते अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / भोपाळ / पानिपत- मध्य प्रदेशच्या मुरैनातील भवरेछा गाव. येथे एकच विहीर आहे. तीतही एवढे कमी पाणी की ग्रामस्थांना कमरेला दोर बांधून विहिरीत उतरावे लागते. गावात सुमारे १५० कुटुंबे राहतात, पण विहिरीत एवढे कमी पाणी अाहे की त्राही-त्राही निर्माण होते. तेही प्रदूषित पाणी. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे हे एक उदाहरण. देशभरात पिण्याच्या पाण्याची अशीच टंचाई आहे.  

राजस्थानच्या अलवरमधील बहतुकलामध्ये लोक सामान, रोख आणि जनावरांना खुले सोडतात, पण पाण्याच्या टाकीला कुलूप लावतात. हीच स्थिती नागौरच्या पालडी कलां येथील. घरात पाण्याची चोख व्यवस्था हवी, अन्यथा मुलाला दुसऱ्या शहरात स्थलांतरित व्हावे लागेल, अशी अटच लग्नाच्या आधी मुलीकडचे घालतात. बिहारमधील पाटण्याजवळील नौहट्टा, रोहतास आणि चुनारी भागात तर लोक आजही १०-१५ किमी अंतरावरून पिण्याचे पाणी आणतात.  

वॉटरअॅडच्या अलीकडेच जारी अहवालानुसार, ग्रामीण भारतात ६.३४ कोटी लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. गावात फक्त १८ टक्के कुटुंबांकडेच पिण्याचे पाणी जलवाहिनीद्वारे येते. दुसरीकडे, राष्ट्रीय ग्रामीण पाणी कार्यक्रमांतर्गत देशात २०१६-१७ मध्ये ग्रामीण भागांत ५६,८३५ वसाहतींत पाणी पोहोचवण्याच्या उद्दिष्टाच्या तुलनेत डिसेंबर २०१६ पर्यंत फक्त २७ टक्केच काम झाले होते. ४८ वर्षांत धोरणे आणि योजना असतानाही पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. सरकारच्या माहितीनुसार, २०१६ पर्यंत ३०८ जिल्ह्यांत म्हणजे ४४ टक्के जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.  
 
 
१९४९ मध्ये भोर समितीने पुढील ४० वर्षांतच ९० टक्के लोकसंख्येला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट होते. देशाच्या २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांनुसार, देशातील सुमारे २५ कोटी कुटुंबांपैकी ११ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळत आहे, आठ कोटी लोक हातपंपाचे पाणी पीत होते. सुमारे एक कोटी कुटुंबे पाऊस, नदी/कालवे, तलाव किंवा इतर स्रोतांचे पाणी पीत होते. 

शहरी भागात ७० टक्के लोकांना घरात पाइपद्वारे पाणी मिळते. देशात सर्वात जास्त वाहिनीद्वारे सुमारे ९५.५ टक्के घरांत पोहोचते. बिहारमध्ये हा आकडा फक्त २० टक्के आहे. देशातील १६.७८ कोटी कुटुंबांपैकी फक्त १६ टक्के कुटुंबांनाच जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्ध केले जात आहे. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह म्हणतात, माझ्या अनुभवानुसार देशात सुमारे अर्ध्या लोकसंख्येला पिण्यालायक पाणी मिळत नाही. शहरांत लोक ५० टक्के पिण्याचे पाणी खरेदी करत आहेत. देशात पाण्याची कमतरता नसतानाही ही स्थिती आहे. मोठ्या लोकांना पाण्यावर कब्जा केला आहे किंवा मग उद्योग पाणी दूषित करत आहेत. ते म्हणतात की, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात २.६५ लाख गावांत  पिण्यायोग्य पाणी नाही. मनरेगात गावांत तलाव खोदणे आणि इतर कामांचा समावेश करूनही गावात प्रभावी आणि स्थायी उपायच होत नाही.  
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी...
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...