आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-रिटर्न सुलभ, आधीपासून विवरणयुक्त आयटी फॉर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा प्राप्तिकर रिटर्न ऑनलाइन दाखल कराल तेव्हा तुम्हाला रिटर्न अर्जात तुमची बरीचशी माहिती आधीपासूनच भरलेली असल्याची दिसू शकते. ऑनलाइन रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या हेतूने आयकर विभाग पोर्टलवर आधीपासूनच भरलेला (प्री-फिल्ड) रिटर्न फॉर्म उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्राप्तिकरदात्यांची सोय होणार आहे. गरजेनुसार ते फॉर्ममध्ये बदलही करू शकतील. सध्या फॉर्ममधील सर्व माहिती करदात्यांनाच भरावी लागते.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) प्रमुख अनिता कपूर म्हणाल्या, अशा अर्जांत करदात्यांची माहिती आपोआपच अपलोड होईल. ही सुविधा येत्या वित्तवर्षापासूनच अमलात यावी, अशी इच्छा आहे. सध्या एका पानाचा आयटीआर भरणाऱ्यांना सुरुवातीला ही सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे नवीन ई-फायलिंग प्रणाली याच वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाली होती.
आकडेवारीवर नजर
- २.०६ कोटी प्राप्तिकर रिटर्न ई-फायलिंग पोर्टलद्वारे दाखल झाले.
- हा आकडा गतवर्षाच्या तुलनेत २६.१२ टक्क्यांनी जास्त आहे.
- ४५.१८ लाख रिटर्नची बंगळुरूस्थित सीपीसीत प्रोसेसिंग. -
- २२.१४ लाख करदात्यांना रिफंड. ३२.९५ लाख ई-रिटर्न इलेक्ट्रानिक व्हेरिफाय झाले.