आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज, पाणी थकबाकीदारांना करा निवडणूक लढवण्यास बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वीज, पाणी थकबाकीदार असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास मज्जाव असला पाहिजे. त्यांना अपात्र ठरवण्यासाठी कायद्यात बदल करण्याची गरज निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.  
 
लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मध्ये दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कायदा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. जेणेकरून अशा थकबाकीदार उमेदवारांना लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्यास मनाई करता येऊ शकेल. त्यासाठी १९५१ च्या कलम तीनमध्ये सुधारणा करावी लागेल, असे आयाेगाचे म्हणणे आहे. हा मुद्दा सरकारकडे पडून आहे.  
 
२०१५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने अगोदर पाणी व विजेचे थकबाकीदार नसल्याचे जाहीर करावे. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र घेऊन आयोगाने उमेदवाराबद्दलची खातरजमा करून घ्यावी. त्यामुळेच फेब्रुवारी २०१६ पासून आयोगाने विशिष्ट प्रमाणपत्र काही संबंधित संस्थांकडून घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांनी अगोदर आपल्याकडील थकबाकी द्यावी, त्यानंतरच निवडणूक लढवावी, असे कोर्टाने स्पष्ट केले. त्यानंतर मार्च २०१६ मध्ये आयोगाने राजकीय सहमतीसाठी बैठका घेतल्या होत्या. त्यात पक्षांना नाहरकत प्रमाणपत्राबद्दल समजावून सांगितले होते.  
बातम्या आणखी आहेत...