आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सवरून पक्षाचे चिन्ह काढून टाकण्याबाबत याचिका उच्च न्यायालयात दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सवरील राजकीय पक्षांचे चिन्ह काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली प्रदेश निवडणूक आयोगाने मात्र ही याचिका फेटाळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली आहे.  
 
याचिकेवरील आदेशामुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांवर थेट परिणाम होईल. याचिकेमध्ये सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांचा उल्लेख केलेला नाही. याचिकाकर्त्यांनी या खटल्यात मुख्य निवडणूक आयोगाला पार्टी केले नाही. राज्य निवडणूक आयोग भारतीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आहे. 
 
तसेच ईव्हीएमवर उमेदवाराचे छायाचित्र लावण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला सांगितले. विधी शाखेची विद्यार्थिनी संजना गहलोत हिने यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
 
बातम्या आणखी आहेत...