आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

67 हजार बाबूंच्या ‘रेकॉर्ड’चा आढावा घेणार सरकार, कामचुकारांना घरी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - केंद्र सरकार ६७ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी-अधिकाऱ्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड म्हणजेच कामकाजाचा आढावा घेणार आहे. यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कामचुकार अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून सरकारी सेवेत सुधारणा करणे हा यामागील उद्देश आहे.   

कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आचरण संहितेचे पालन न करणाऱ्यांना शिक्षा दिली जाईल. एकूण ६७ हजार कर्मचाऱ्यांपैकी २५ हजार हे अ श्रेणीतील सेवांचे आयएएस, अायपीएस व आयआरएस अधिकारी आहेत. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर धोरण अवलंबवत आहे.’  
 
कामचुकारांना घरी...
केंद्र सरकारने अपेक्षेनुरूप काम न करणाऱ्या १२९ कर्मचाऱ्यांना गतवर्षी सक्तीची सेवानिवृत्ती दिली आहे. कायद्यानुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या कामाचा दोन वेळा आढावा घेतला जाताे. पहिला आढावा त्याच्या नोकरीची १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि  दुसरा २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केला जातो.
बातम्या आणखी आहेत...