आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक, कोळसा, वाहतुकीला संपामुळे फटका, हरियाणा, आंध्र प्रदेशात हजारो संपकरी ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. केरळ, तेलंगणात त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. बँकिंग, वाहतूक, कोळसा क्षेत्राला त्याचा अधिक फटका बसला आहे. दरम्यान, हरियाणा, झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात हजारो संपकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
देशातील दहा केंद्रीय कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात संपामुळे बँकिग सेवेवर परिणाम दिसून आला. कर्नाटकात संमिश्र परिणाम दिसला. राज्य परिवहनच्या गाड्या स्थानकात विश्रांती घेत असल्याचे दिसून आले. परंतु राज्यातील बाजारपेठ मात्र सुरळीत सुरू होती. वाहतूक संघटनेने संपाला पाठिंबा दिला असला तरी बंगळुरूतील वाहतुकीवर त्याचा परिणाम नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनांनी शाळा बंद ठेवल्या होत्या. संपामुळे आेडिशात जनजीवन ठप्प झाले होते. रेल्वे सेवेवर त्याचा सर्वाधिक परिणाम दिसला.
निदर्शकांनी भुवनेश्वर, कटक, बेरहमपूर, संबलपूर, भद्रक, बालासोर इत्यादी ठिकाणी रेल रोको केला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांची कुचंबणा झाली. काही एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावल्या. त्या शिवाय मालवाहतूक करणाऱ्या गाड्याही धावू शकल्या नाहीत. बस, ट्रक, रिक्षादेखील रस्त्यावर उतरल्या नव्हता. त्यामुळे आेडिशातील रस्त्यावर निदर्शक वगळता शुकशुकाट होता. काही भागात आंदोलकांनी टायर जाळून फेकले होते. त्रिपुरामध्ये जनजीवन ठप्प झाला होते. इतर राज्यांप्रमाणे वाहतूक सेवेवर परिणाम दिसून आला.
पुद्दुचेरीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. रस्ता रोको करणाऱ्या हजारावर कामगारांना अटक करण्यात आली. पंजाब, हरियाणातील वाहतुकीलाही संपाचा फटका बसला. शैक्षणिक संस्था, आरोग्य, वीज इत्यादी क्षेत्रातील कर्मचारीही संपात सहभागी झाले होते. हजारावर परिचारिकांनी देखील संपाला पाठिंबा दिला होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कोठे काय घडले...
बातम्या आणखी आहेत...