आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाचा मल्ल्याला प्रश्न; संपत्तीची माहिती खरी आहे का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - दिलेली संपत्तीची सर्व माहिती खरी आहे की नाही? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने पळपुटा उद्योजक विजय मल्ल्याला विचारला आहे. मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आपल्या तीन मुलांच्या खात्यांवर चार कोटी डाॅलर (२६९ कोटी रु.) हस्तांतरित केले असल्याचा आरोप एसबीआयच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाने 
केला आहे. 

या आरोपाचे उत्तर मागतानाच न्या. ए. के. गोयल आणि न्या. यू. यू. ललित यांच्या पीठाने मल्ल्याच्या वकिलांना हा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने या प्रकारणातील निकाल राखून ठेवला आहे. मल्ल्याच्या विरोधात न्यायालयाच्या अवमाननाप्रकरणीचा निर्णयदेखील न्यायालयाने राखून ठेवला आहे.  

बँकांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी विजय मल्ल्याने चार कोटी डॉलर इंग्लंडमधील संस्था डियाजिओने फेब्रुवारी २०१६ मध्ये दिले असल्याचे सांगितले. 

कर्नाटक उच्च न्यायालयाने मल्ल्याच्या वतीने कोणत्याही चल किंवा अचल संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी घातलेली आहे. असे असले तरी मल्ल्याने पैसे कुटुंबीयांच्या संस्थेच्या नावावर हस्तांतरित केली आहे. मल्ल्यांचे तीन मुले या ट्रस्टचे लाभार्थी आहेत. माझी सर्व संपत्ती जप्त असल्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा पैसा शिल्लक नसल्याचे मल्ल्याचे म्हणणे आहे. 

सर्वोच्च न्यायालयात अकरा जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान बँकांच्या याचिकेवर मल्ल्याला शपथपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आधीदेखील ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यायालयात विदेशी संपत्तीची माहिती दिली नसल्यामुळे मल्ल्याला फटकारले होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...