आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईव्हीएम घोळप्रकरणी विरोधक ‘ईसी’कडे; भविष्यात निवडणुकांत व्हीव्हीपीएटी वापरण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून सोमवारी विरोधी पक्षांनी एकत्र येत निवडणूक आयोगाची भेट घेण्याचे ठरवले आहे. विरोधी पक्षांचे नेते संसदेत भेटले व त्यानंतर त्यांनी ईव्हीएमबाबतची चिंता निवडणूक आयोगाकडे मांडण्याचे ठरवले अाहे. 
 
भविष्यात निवडणुकांत व्हीव्हीपीएटी वापरण्यात यावे, ही विरोधी पक्षांची मागणी आहे. ईव्हीएमचा कथित घोळ पाहता भविष्यात मतपत्रिका वापरण्याची काँग्रेसची मागणी आहे. निवडणूक आयोगाने या मुद्द्यावर आश्वस्त करावे, अशी मागणी आहे. 
बातम्या आणखी आहेत...