आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर कळेल परीक्षा केंद्राचे अंतर, विद्यार्थ्यांची झाली सोय, सीबीएसईचे नवे अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) दहावी व बारावीचे विद्यार्थी यंदा अॅपच्या माध्यमातून परीक्षा केंद्र ऑनलाइन पाहू शकणार आहेत. मंडळाने याबाबतचे अॅप तयार केले असून त्याची चाचणी घेतली जात आहे. याच महिन्यात अॅप लाँच होईल. यामध्ये सन २०१७ च्या बोर्ड परीक्षेच्या ४ हजार केंद्रांची माहिती असेल. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राची शोधाशोध करण्यासाठी फिरावे लागू नये यासाठी अॅप मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करेल.  

बोर्डाचे परीक्षा नियंत्रक के. के. चौधरी यांनी सांगितले की, आता परीक्षा केंद्राची माहिती तसेच विविध कॅब एजन्सीच्या सेवांमध्ये दाखवल्याप्रमाणे जाण्याचा रूट मॅप विद्यार्थ्यांना ऑनलाइन दिसेल. उदाहरणार्थ, तुम्ही कॅबने इच्छित स्थळी जात असता तेव्हा कॅबचालकाच्या समोर लावलेल्या मोबाइलवर दिशादर्शक अॅपद्वारे रस्ता व वेळ दाखवली जाते. याच पद्धतीने अॅपमधून विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्याचा नकाशा दिसेल असे नव्हे तर शाळेचे छायाचित्रही दिसेल.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...