आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फूड इंडस्ट्रीत तीन वर्षांमध्ये होणार ४ लाख कोटी रुपयांची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील फूड इंडस्ट्रीचा विकास दरवर्षी ११ टक्क्यांनी वाढू लागला आहे. सध्या या क्षेत्राची उलाढाल २.४७ लाख कोटी रुपये आहे. २०१८ पर्यंत या क्षेत्राची उलाढाल ४ लाक कोटी रुपयांपर्यंत जाईल.

आयआयएम कोलकाता आणि अकादमी फाउंडेशनने एका संयुक्त अहवालात हा दावा केला. भारतात भोजन आणि किराणा सामानाचा एकूण खर्च लोकांच्या एकूण खर्चाच्या सरासरी ३१ टक्के आहे. इतर देशांच्या तुलनेत हा खर्च सर्वाधिक आहे. अमेरिकेत सरासरी खर्च केवळ ९ टक्के, ब्राझीलमध्ये १७ टक्के आणि चीनमध्ये २५ टक्के असे किराण्यावरील खर्चाचे प्रमाण आहे. खाद्य उद्योगाच्या पुरवठ्यात परदेशी कंपन्यांना स्थान देण्यात आल्याने भारताला त्याचा अधिक फायदा झाला आहे. त्यानुसार अनेक परदेशी कंपन्यांनी देशात उत्पादनाच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे स्थानिकांना नोकऱ्यांची चांगली संधी निर्माण झाली आहे. अनेक कंपन्या शेतकरी आणि उत्पादकांच्या सहकार्याने काम करू लागल्या आहेत. त्यामुळे कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाला अनुषंगाने तंत्रज्ञान, नवीन उत्पादन आणि निर्यातीत फायदा होऊ शकेल.