आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

115 स्टेशनवरील 50 लाख लोकांना मोफत वायफाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील ११५ रेल्वेस्थानकांवर जवळपास ५० लाख प्रवाशांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी मोफत वायफाय सुविधा पुरवण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. याशिवाय धावत्या रेल्वेमध्ये अशी सुविधा देण्याचा प्रस्ताव असल्याचेही प्रभू म्हणाले.  

प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रभू म्हणाले, रेल्वेची उपकंपनी रेलटेल कॉर्पाेरेशन ४०० रेल्वेस्थानकांवर मोफत वायफायची सुविधा पुरवत आहे. यासाठी सरकारकडून कोणताही निधी दिला जात नाही. फेब्रुवारी महिन्यांत सर्व ११५ स्थानकांवर सुमारे ५० लाख प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ४०० रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय सेवा दिली जाणार आहे. वायफाय ही सार्वजनिक सुविधा आहे, त्यामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर स्थानकावर मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रत्येकालाच ती दिली जाते. याशिवाय धावत्या रेल्वेमध्ये वायफाय देण्याचा प्रस्ताव आहे, असे प्रभू यांनी सांगितले. काही रेल्वेमध्ये वायफाय आधीपासूनच आहे. यात आणखी रेल्वेंची भर टाकली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...