आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहजुळणी साइट्सवर फसवणूक; पोर्टल चालवणा-यांना शिक्षा व्हावी, महिला आयोगाची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केस-1 - अगोदर लग्न, नंतर माघार
१५ सप्टेंबर २००३ रोजी लंडनच्या अमित गोयलने मेरठमध्ये साइटवर नोंदणी करून अंकिताशी लग्न केले. मात्र अमितने नंतर माघार घेतली. "तो'अन्य कोणी अमित असेल, असे उत्तर त्याने दिले. प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. न्यायालयाने अमितला दोषी ठरवले.

केस-2 - पत्नी विवाहित निघाली
अशा साइटच्या माध्यमातून ३२ वर्षीय तरुणाचे इंदूरच्या २३ वर्षीय तरुणीशी लग्न जमले होते. संबंधित मुलीचा पूर्वीच विवाह झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. पहिल्या पतीने घटस्फोटही दिला नव्हता. आता १० महिन्यांच्या मुलीच्या ताब्यासाठी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

नवी दिल्ली - वधू-वर सूचक वेबसाइट्सच्या माध्यमातून होणा-या विवाहांचे हे साइड इफेक्ट आहेत. असे असतानाही या साइट्सच्या जाहिरातींचा व्यवसाय ३० टक्के दराने वाढत आहे. साइट्सवर दररोज १० हजार नोंदण्या होतात, मात्र त्यातील १० टक्केच विवाहात रूपांतरित होतात. फसवणूक व अविश्वासाचा हा परिपाक आहे. सायबर तक्रारींमध्ये २० ते ३० टक्के प्रकरणे ऑनलाइन मॅरेज ब्युरोशी संबंधित आहेत. त्यांना आळा घालण्याचे उपाय वेबसाइट चालवणा-यांकडे नाहीत.

राष्ट्रीय महिला आयाेगाच्या सदस्य हेमलता खेरिया यांच्यानुसार, गेल्या महिन्यात केंद्रीय महिला-बाल विकास मंत्रालयाला यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. यासोबत माहिती-तंत्रज्ञान कायदा २००० व २००८ मध्ये दुरुस्ती करून फसवणुकीतील मुख्य आरोपीला ७ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली.
अशा साइट चालवणा-यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस यात आहे. राजस्थान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष लाड कुमारी जैन यांच्यानुसार, बहुतांश एनआरआय ऑनलाइन लग्न जमवतात. अशात एका प्रकरणात तरुण-तरुणीची भेट लग्नपत्रिका छापल्यानंतर झाली. नंतर मतभेद झाले व फसवणुकीची तक्रार दाखल झाली. इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयात अशी ७ प्रकरणे आहेत. राज्य महिला आयोगाच्या सदस्य स्नेहलता उपाध्याय म्हणाल्या, ऑनलाइन नात्यात चुकीची माहिती
दिल्यानेच नाती तुटत आहेत.

दोन्ही पक्षांच्या चर्चेनंतरची जबाबदारी नाही
विवाहजुळणी साइट्स या फसवणुकीची जबाबदारी घेत नाहीत. भारत मॅट्रिमोनीच्या व्यवस्थापक विनीता ठाकूर म्हणाल्या, दोन्ही बाजूंच्या मोबाइल क्रमांकांची चौकशी केली जाते. यानंतर मुला-मुलींच्या भेटीवेळी भविष्यात होणा-या कोणत्याही वादास आम्ही जबाबदार नसल्याचे त्यांना सांगण्यात येते.

शादी डॉट कॉमची काउन्सेलिंग
ऑनलाइन पोर्टल नातेसंबध वाचवण्यासाठी काही दिवसांपासून काउन्सेलिंग करत आहेत. शादी डॉट कॉमने देशभरात आपल्या १०० सेंटर्सवर ऑनलाइन कॅम्पेन आणि काउन्सेलिंग सुरू केली होती. भारत मॅट्रिमोनी डॉट कॉमच्या मालक चेन्नईच्या कन्सिम इन्फो प्रायव्हेट लिमिटेडने यशस्वी लग्नाचे सिद्धांत सांगणारी ५० हजार पत्रके वाटली होती.