आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2020 पर्यंत कार्डही होतील कचरा, अंगठ्यांच्या वापरानेच होतील सर्व व्यवहार : नीति आयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नोटबंदीनंतर केंद्र सरकारकडून डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यावर 2020 पर्यंत देशात क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशीनची गरज पूर्णपणे संपणार असल्याचे निती आयोगाने म्हटले आहे. आगामी काही वर्षांत कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी केवळ अंगठ्याचा वापर केला जाईल असे सांगण्यात आले आहे. 
 
भारत मोठी उडी घेणार 
- प्रवासी भारतीय दिनाच्या 2017 च्या एका कार्यक्रमात निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत म्हणाले की, फायनान्शियल टेक्‍नॉलॉजी आणि सोशल इनोव्हेशन दोन्ही बाबतीत भारत मोठ्या स्थित्यंतराच्या स्थितीत आहे. 
- कांत म्हणाले की, या सोशल इनोव्हेशनमुले भारत एक मोठी उडी घेईल. माझ्या मते 2020 पर्यंत देशातील सर्व डेबीट कार्ड्स, क्रेडीट कार्ड्स, एटीएम मशीन आणि पीओएस मशीन काहीही कामाचे नसतील. 
 
30 सेकंदात होईल ट्रान्झेक्शन 
- अमिताभ कांत म्हणाले, भारतात या सर्व गोष्टींची गरजच राहणार नाही. अवघ्या 30 सेकंदात नागरिकांना अंगठ्याचा वापर करून व्यवहार करता येतील. 
- ते म्हणाले, सध्या आम्ही ज्या पद्धतीने व्यापक दृष्टीकोनातून नवनवीन गोष्टींचा अवलंब करत आहोत त्यामुळे डिजिटल पेमेंट आणि या क्षेत्रात मोठा बदल घडणार आहे. 

तरुण उभी करतील 10 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था 
- अमिताभ कांत म्हणाले, दोन लाख कोटी डॉलर ही फॉर्मल इकोनॉमी आहे आणि एक लाख कोटी डॉलरची इनफॉर्मल इकॉनॉमी आहे. अशा प्रकारे भारताला 10 हजार कोटींची इकॉनॉमी बनता येणार नाही. अशा स्थितीत भारताला विकास करणे शक्य होणार नाही. 
- ते म्हणाले की, ग्रोथसाठी नॉन-फॉर्मल इकॉनॉमीला फॉर्मल इकॉनॉमीत बदलणे गरजेचे आहे. 
- कांत म्ङणाले, नव्या टेक्नॉलॉजीसाठी स्वतःला तयार करण्यात ग्रामीण भागातील लोकांची क्षमता शहरी लोकांपेक्षा अधिक आहे. 
 
10% वेगाने विकास करण्याचे आव्हान 
- कांत म्हणाले की, देश सध्या 7.6 च्या विकास दराने पुढे सरकत आहे. पण भारतासमोर तीन दशके किंवा त्यापेक्षा अधिक काळ  9 ते 10 टक्क्याच्या वेगाने पुढे सरकण्याचे आव्हान आहे. 
- कांत यांनी देशाच्या तरुणांच्या लोकसंख्येबाबत म्हटले की, ज्याप्रमाणे यूरोप आणि जगातील इतर देशांत लोकसंख्या म्हातारी होत आहे, त्या काळात भारतातील लोकसंख्या ही तरुण आहे. त्यामुळे ही देशासाठी पुढे जाण्याची सर्वात योग्य संधी आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...