आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिलेश भावी मुख्यमंत्री; युतीचा प्रचार करणार,मुलायमसिंहांचे घूमजाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी पुन्हा घूमजाव केले. ‘आपण उद्यापासून समाजवादी पक्ष-काँग्रेस युतीचा प्रचार करू, तसेच अखिलेश यादव हेच भावी मुख्यमंत्री असतील,’ अशी माहिती मुलायमसिंह यांनी दिली.  

मुलामयसिंह यांनी आठवडाभरापूर्वी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या युतीच्या विरोधात भाष्य केले होते. आपण युतीचा प्रचार करणार नाही, अशी भूमिकाही त्यंानी घेतली होती. यासंदर्भात संसद भवनात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला असता मुलायमसिंह म्हणाले की, ‘अखिलेश हेच भावी मुख्यमंत्री असतील. मी उद्यापासून समाजवादी पक्ष-काँग्रेस युतीचा प्रचारही करणार आहे.’  
पक्षात बाजूला पडलेले मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव हे नाराज असून, त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यावर पक्षात मतभेद आहेत का, असा प्रश्न विचारला असता मुलायमसिंह यांनी नकारार्थी उत्तर दिले. ‘कोणीही असमाधानी नाही. शिवपाल यांचे माझ्याशी किंवा पक्षातील कोणाशीही बोलणे झालेले नाही. ते रागाच्या भरात तसे म्हणाले असतील. आता ते सोडून द्या. कुठलाही नवा पक्ष स्थापन 
होणार नाही,’ असे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले.
 
आधी म्हणाले होते, प्रचार करणार नाही  
मुलायमसिंह यांनी २९ जानेवारी रोजी सपा-काँग्रेस युतीबद्दल असमाधान व्यक्त करत आपण युतीचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात निवडणूकपूर्व युती केली आहे. विधानसभेच्या ४०३ जागांपैकी समाजवादी पक्ष २९८, तर काँग्रेस १०५ जागा लढवत आहे. आपल्या समर्थकांना तिकीट नाकारल्यामुळे शिवपाल यादव यांनीही गेल्या आठवड्यात असमाधान व्यक्त करत, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर (११ मार्च) नवीन पक्ष स्थापन करू, अशी घोषणा केली होती.  
बातम्या आणखी आहेत...