आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार ओळींचा बायोडाटा, गजेंद्र चौहान अध्यक्षपदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्र सरकारने केवळ एका परिच्छेदाच्या बायोडाटावरून गजेंद्र चौहान यांना भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) चेअरमनपदी नियुक्त केले. आरटीआय अर्जाच्या उत्तरादाखल ही माहिती मिळाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने फायलीवरील नोटिंगचा खुलासा केला आहे. त्यात म्हटले की, ‘चौहान उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांना महाभारत मालिकेत पांडवांतील सर्वात ज्येष्ठ बंधू ‘युधिष्ठिर’ साकारण्यासाठी ओळखले जाते. त्यांनी १५० चित्रपट आणि ६०० मालिकांत काम केलेले आहे.’ चौहान यांची काही महिन्यांपूर्वी एफटीआयआयच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली. आरटीआय अर्जदाराने गजेंद्र यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक योग्यतेची माहिती मागितली होती.
बातम्या आणखी आहेत...