आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 ग्रॅम साेन्याच्या तस्करीसाठी अवलंबले सात फंडे; शर्टाची बटणे, पॅन्टची चेनमध्ये हाेते साेने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -विदेशातून अवैध मार्गाने भारतात साेने अाणण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, इंदिरा गांधी अांतरराष्ट्रीय (अायजीअाय) विमानतळावर साेनेतस्करीचे एक असे प्रकरण समाेर अाले अाहे, ज्यात एका इसमाने साेन्याच्या तस्करीसाठी एक-दाेन नव्हे, तर सात वेगवेगळे फंडे अवलंबले हाेते. 

विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकारी एका तस्कराच्या ज्या बॅगा तपासत हाेेते, त्यात काेणत्या ना काेणत्या पद्धतीने साेने लपवले हाेते. तथापि, संबंधित तस्कराने सीमा शुल्कचे नियमदेखील पाळले हाेते. ५०० ग्रॅम साेन्याची तस्करी करताना पकडले गेल्यास अापल्याला अटक हाेणार नाही. केवळ निश्चित केलेले शुल्क देऊन सर्व साेने परत मिळू शकते, हे त्याला माहीत हाेते. त्याने सातही विविध प्रकारच्या सामानामध्ये केवळ ५०० ग्रॅम साेन्याचा वापर केला हाेता. ५०० ग्रॅम साेन्याची किंमत बाजारपेठेत सुमारे १५ लाख अाहे.हा तस्कर दुबईहून अायजीअाय विमानतळावर उतरला हाेता.  त्याने बॅगेत ठेवलेल्या दाेन शर्टांची सर्व बटणे, पॅन्टची चेन, निब अादी साेन्याचे तयार केले हाेते. तसेच पाकिटाच्या चारही बाजूंना साेन्याचा मुलामा दिलेला हाेता. याशिवाय माऊथअाॅर्गनच्या अात असलेल्या सर्व प्लेट‌्स साेन्यापासून बनवलेल्या हाेत्या. ताे सामान्य माऊथअाॅर्गनसारखा वाजत हाेता. त्याचप्रमाणे छत्रीला लावण्यात येणाऱ्या सर्व तारा साेन्याच्या तयार केल्या हाेत्या. बॅगेतून कंठहाराचे साेन्यापासून बनवलेले माेतीदेखील जप्त करण्यात अाले; परंतु त्यांच्यावर चांदीचे पाणी चढवले गेले हाेते.
 
दुबईतील एका बाजारातून खरेदी केले हाेते सर्व सामान चाैकशीदरम्यान त्या तस्कराने सांगितले की, साेन्यापासून बनलेले सर्व सामान दुबईतील एका बाजारातून खरेदी केले. दुबईतील हा बाजार साेन्याची तस्करी करणाऱ्यांसाठीच भरताे. तेथे अनेक अशा वस्तू मिळतात, ज्यात साेने लपवले जाऊ शकते. तसेच एक्स-रे केल्याविना काेणीही ते अाेळखू शकत नाही.

याबाबत बाेलताना सीमा शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी दुबईहून अायजीअाय विमानतळावर उतरलेल्या एका इसमाला तपासणीसाठी टर्मिनल-३ जवळील एका हाॅलमध्ये थांबवण्यात अाले. त्याच्याकडे इतर प्रवाशांकडे असतात तशाच बॅगा व सामान हाेता. मात्र, एक्स-रे काढल्यानंतर मिळालेल्या संकेतामुळे अामच्या पथकाला संशय अाला. त्यामुळे त्याच्याकडील बॅगांमधील सर्व सामानाची बारकाईने तपासणी करण्यात अाली. त्यात हा प्रकार उघडकीस अाला. त्याने सोने तस्करीसाठी सात वेगवेगळे फंडे अवलंबले होते, हे तपासात स्पष्ट झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...