आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या दागिन्यांच्या विक्रीवर 3% GST : जुने देऊन नवे दागिने घेतले तर कर होईल ‘अॅडजस्ट’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
 नवी दिल्ली - जुने दागिने वा सोने-चांदी विकल्यास त्यावर ३ टक्के जीएसटी कर लागेल. मात्र, जुने दागिने देऊन त्याबदल्यात नवे घेतल्यास नव्या दागिन्यांवर लागणाऱ्या करात हा ३% कर ‘अॅडजस्ट’ होईल. महसूल सचिव हसमुख आढिया बुधवारी ‘जीएसटी मास्टर क्लास’मध्ये म्हणाले, व्यापाऱ्याला सहा वर्षांपर्यंत अकाउंटचा रेकॉर्ड ठेवावा लागेल.
 
ज्वेलरने एखाद्याकडून जुने दागिने खरेदी केल्यास तो रिव्हर्समध्ये ३% कर आकारेल. म्हणजे दागिने एक लाख रुपयांचे असतील तर त्यातून ३ हजार रुपये कापून घेतले जातील. एखाद्याने जुन्या दागिन्यांत काही बदल वा दुरुस्ती केली तर त्याला जॉब वर्क समजून या कामासाठी घेतलेल्या रकमेवर ५% जीएसटी लागेल.
बातम्या आणखी आहेत...