आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांत 140 % वाढेल देशाचे ऑनलाइन मॅट्रिमोनी मार्केट, 50% पेक्षा जास्त भारतीयांनी 2016 मध्ये गुगलवर शोधला ‘डेटिंग पार्टनर’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात २०१६ मध्ये गुगलच्या सर्च इंजिनवर जो कीवर्ड सर्वाधिक सर्च झाला तो होता ‘डेटिंग पार्टनर’. देशात २०१५ च्या तुलनेत गेल्या वर्षी जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सहचारिणीच्या शोधासाठी इंटरनेटची मदत घेतली. याशिवाय वर्षभरात ५३ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी गुगल प्लेस्टोअरवरून स्मार्टफोनमध्ये डेटिंग अॅप्स डाऊनलोड केले. गुगलच्या २०१६ च्या इयर इन सर्च अहवालात वरील बाबी समोर आल्या. देशात विवाह व जोडीदारासाठी इंटरनेटची ज्या प्रमाणात मदत घेतली जाते ते पाहता २०२० पर्यंत ऑनलाइन मॅट्रिमोनी बाजारपेठ १,१९७ कोटी रुपयांचे होईल. सध्या ही बाजारपेठ ४९२ कोटी रुपये आहे. ३ वर्षांत यामध्ये जवळपास १४० टक्क्यांची वाढ होईल. भारतीयांनी केवळ डेटिंग व जीवनसाथीच्या शोधासाठी सर्च केले असे नव्हे तर ते लग्नाच्या नियोजनासाठीही सर्च इंजिनची मदत घेत आहेत. वधूचा पोशाख, मेकअप, लग्नाच्या तयारीबाबतचे निर्णयही इंटरनेटच्या साहाय्याने होत आहेत. अशा लोकांची संख्या ३० टक्के वाढली आहे. भारतात गुगलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन म्हणाले, देशात ऑटो, बँकिंग, शिक्षण, पर्यटन, करमणूक प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाइन सर्चिंग वाढली आहे. मात्र, डेटिंग व वधूसंशोधनाची सर्चिंग सर्वात जास्त असून ती वेगात वाढ आहे. इंटरनेट व स्मार्टफोन प्रकरणात भारत जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.
 
इंटरनेट स्पीड वाढली तरीही अापण मागेच...  
देशात २०१६ च्या अंतिम तिमाहीत इंटरनेट स्पीड आधीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढली. अकामाईच्या  अहवालानुसार देशात आता इंटरनेटचा सरासरी वेग ५.६ एमबीपीएस आहे. मात्र, जगभरात इंटरनेट स्पीडमध्ये आपण अद्याप मागे आहोत. जागतिक क्रमवारीत भारत ९७ व्या स्थानावर आहे. सरासरी इंटरनेट स्पीड २६.१ एमबीपीएस आहे.  
 
 ४३ % जास्त पुरुषांनी घेतल्या ग्रुमिंग टिप्स  
अहवालानुसार, २०१६ मध्ये देशात महिलांनी ७७ टक्के खरेदी ऑनलाइन केली आहे. आधीच्या तुलनेत ६२ टक्के सौंदर्य उत्पादनांची खरेदी केली. पुरुषांनी चांगले दिसावे यासाठी गुगलची मदत घेतली. २०१५ च्या तुलनेत ४३ टक्के जास्त पुरुषांनी देखणे दिसावे व व्यक्तिमत्त्व विकासासाठी गुगलचा सल्ला घेतला. सध्या भारतात १.५ कोटी महिला ऑनलाइन शॉपिंग करत आहेत. २०२० पर्यंत हा आकडा ७.५ कोटी होईल.
बातम्या आणखी आहेत...