आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराष्ट्रपतिपदासाठी महात्मा गांधींच्या नातवाचे नाव, गोपालकृष्ण यांना 18 पक्षांकडून उमेदवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना १८ विरोधी पक्षांनी संयुक्तरीत्या उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार बनवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला आहे. बैठकीत जनता दलाचे नितीशकुमार, शरद यादव, तृणमूल, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. जदयूने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मीरा कुमार यांना पाठिंबा न देता रामनाथ कोविंद यांना समर्थन दिले आहे. बैठकीत माजी पंतप्रधान, मनमोहनसिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बहुजन समाज पार्टीचे सतीशचंद्र मिश्रा, माकपचे सीताराम येचुरी, सपचे नरेश अग्रवाल आदी नेत्यांचा समावेश होता.
 
संसदेतील गणित एनडीएच्या बाजूने आहे. मतांच्या गणितानुसार गोपालकृष्ण गांधी यांचा पराभव निश्चित आहे. लोकसभा आणि राज्यसभेत एकूण ७९० सदस्यांपैकी एनडीएचे ४१८ सदस्य असून इतर पक्षांच्या पाठिंब्याने हा आकडा ५५० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...