आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारपणात एका आठवड्यात काढू शकाल ‘जीपीएफ’चे पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली  - केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जीपीएफमधून पैसे काढणे सोपे झाले आहे. कर्मचाऱ्यांना आता केवळ १५ दिवसांतच पैसे मिळतील. आतापर्यंत अशी कोणतीही मर्यादा नव्हती. कार्मिक मंत्रालयाच्या सुधारित नियमांनुसार आजारासारख्या आपत्कालीन स्थितीत एक आठवड्यातच पैसे मिळतील. पैसे काढण्यासाठी १० वर्षे नोकरी  असणे आवश्यक आहे. आजपर्यंत १५ वर्षे नोकरीची अट होती.
 
१२ महिन्यांच्या पगाराएवढी किंवा खात्यात जमा रकमेच्या तीन- चतुर्थांश  म्हणजेच ७५% काढण्याची परवानगी असेल. दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ती काढण्याची परवानगी मिळेल. आजारपणात खात्यात जमा रकमेच्या ९० % काढता येऊ शकेल. पैसे काढण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा द्यावा लागणार नाही. फक्त प्रतिज्ञापत्र भरून देणे पुरेसे असेल. मात्र कर्मचाऱ्याच्या विभागप्रमुखांची परवानगी आवश्यक असेल. सध्या निवृत्तीच्या आधी एक वर्षात कोणतेही कारण न देता ९०% पैसे काढण्याची परवानगी आहे. हा कालावधी वाढवून दोन वर्षे करण्यात आला आहे. 
 
या कामांसाठी काढता येतील पैसे
शिक्षण :
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण. आजपर्यंत हायस्कूलनंतरच परवानगी होती.
वाङ‌्निश्चय/ लग्न : स्वत:चे, कुटुंबीयांचे किंवा आश्रितांचा वाङ््निश्चय, लग्न, उपचार. कुटुंबात एखाद्याचे निधन झाले तरी पैसे काढता येतील.  
कार/ दुचाकी : कार, मोटारसायकल, स्कूटरचे बुकिंग, खरेदी, त्याच्या कर्जाची परतफेड किंवा दुरुस्ती. पूर्वी ही परवानगी नव्हती.  
घर : घर किंवा फ्लॅट खरेदी, गृह कर्जाची परतफेड, घरासाठी जमीन, जुन्या घराची दुरुस्ती, पुनर्बांधणी. ज्या घरासाठी पैसे काढले ते विकल्यास पैसे परत जीपीएफमध्ये जमा करण्याची अट रद्द केली आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...