आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलट दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याने विमानाला दीड तास उशीर, ‘महाराजा’ने मागितली माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रवाशांना ठरल्यावेळी इच्छित ठिकाणी पोहोचता यावे म्हणून केंद्राने नुकतेच नवे विमान वाहतूक धोरण जाहीर केले.फ्लाइट लेट झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाईचा नियम त्यात आहे. मात्र या धोरणाला मंजुरी देणाऱ्या कॅबिनेटमध्ये सहभागी मंत्र्याचीच फ्लाइट मंगळवारी लेट झाली. त्यामुळे ते महत्त्वाच्या बैठकीला जाऊ शकले नाहीत. त्यानंतर मंत्र्यांनी ट्विटरवर एअर इंडियाचा वर्ग घेतला. सलग चार ट्विट केले. गोष्ट मंत्र्यांची होती म्हणून कदाचित एअर इंडियाने तत्काळ माफी मागितली चौकशीचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांना दुपारी १.१५ वाजता एआय ५४४ फ्लाइटने हैैदराबादला जायचे होते. ते दुपारी १२.३० वाजताच विमानतळावर पोहोचले होते. फ्लाइट वेळेवर निघाली नाही तेव्हा ‘पायलट पोहोचला नसल्याने फ्लाइट अर्धा तास लेट आहे,’ असे नायडूंना सांगण्यात आले. दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर नायडू घरी परतले. मग त्यांनी ट्विट केले, ‘मला १.४५ वाजता फ्लाइटची माहिती दिली. परंतु अर्धा तास प्रतीक्षा करूनही फ्लाइट मिळाली नाही. त्यामुळे घरी आलो.’दुसरे ट्विट केले.‘पारदर्शकता विश्वासार्हतेसाठी एअर इंडियाने कारण द्यावे. माझी महत्त्वाची अपाइंटमेंट मिस झाली.’ मग नायडूंच्या ट्विटवर एअर इंडियाने माफी मागत लिहिले की, ‘असुविधेबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. ट्रॅफिक जाममध्ये पायलट अडकल्याने हे घडले. आम्ही चौकशी करू.’ उड्डयनमंत्री गजपती राजू यांनीही ‘अशी गैरसोय स्वीकारली जाऊ शकत नाही,’ असे ट्विट केले.


नायडूंनी ट्विट करताच सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला. टोनीने लिहिले- ‘फ्लाइटलेट झाली. नायडू नाराज झाले. हा हा हा.. त्यांनी विमानतळावर सेल्फी घ्यावी.

प्रशांतनेलिहिले- ‘नायडूंनीसरकारच्या कडू औषधाची चव चाखली.’ स्वप्निलने लिहिले,‘सर ड्रामा नको,सुधारणा करा.’
बातम्या आणखी आहेत...