आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीत वाहतुकीसह सेवांवर लागेल कमी कर; आरोग्य, शिक्षणासह 60 सेवा जीएसटीत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) सेवांवर १९ टक्के कर लागेल, सध्या सेवांवर १५ टक्के कर लागतो. यामुळे सेवा थोडी महागणार आहे. मात्र, आरोग्य आणि शिक्षणासारख्या सुमारे ६० सेवा जीएसटीअंतर्गत येणार नाहीत.

सध्या ज्या सेवांवर १५ टक्क्यांपेक्षा कमी कर लागतो त्यांना ५ टक्के किंवा १२ टक्क्यांच्या कर टप्प्यात ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. राजस्व सचिव हसमुख अढिया यांनी विशेष चर्चेदरम्यान ही माहिती दिली. 

वस्तूंवर (गुड्स) सध्या अबकारी आणि व्हॅट मिळून जितका कर लागतो, जीएसटीमध्ये त्या वस्तंूंनाही जवळपास तेवढ्याच कराच्या टप्प्यात ठेवण्यात येणार आहे. यामुळे काही वस्तूंवरील कर वाढेल, तर काही वस्तूंवरील कर कमी होईल. 

जीएसटीमध्ये कराचे चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. यात ५, १२, १८ आणि २८ टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. जीएसटी परिषद दरवर्षी या कर दराची समीक्षा करणार आहे.  

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...