आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST च्या प्रणालीच्या जनजागृती व अंमलबजावणीसाठी प्रत्येक झोनला 1 कोटी; सीबीईसीचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जनजागृती व अंमलबजावणीसाठी केंद्रीय उत्पादन शुल्क व अबकारी मंडळाच्या (सीबीईसी) प्रमुख वानजा ए. सरना यांनी २३ विभागांसाठी प्रत्येकी १ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सरना यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांमध्ये स्थानिक पातळीवर जीएसटीचे फायदे, नोंदणी आणि तक्रारीबाबत स्थानिक नागरिकांना माहिती देण्यास सांगितले आहे. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी  ओई जनरल हेडअंतर्गत विभागप्रमुखांना १ कोटी रुपये निधी वापरण्यास सांगितले आहे. जीएसटीच्या दिशेने होणाऱ्या कर रचनेच्या स्थलांतरणात विभागाने करदात्यांच्या मुख्य सुविधादात्याच्या रूपात काम करण्यास सांगितले आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर जीएसटीला कायदेशीर मान्यता प्राप्त झाली असून १ जुलैपासून नवी कररचना देशभरात अमलात येण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...