आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: भाजपची गाडी शंभरीच्‍या अात, काँग्रेसला 82 जागा मिळण्याचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरात विधानसभेसाठी हाेऊ घातलेल्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या ९ डिसेंबरला हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर विशेषत: सरकार स्थापनेच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कच्छ, सौराष्ट्र, दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल, कोण मॅजिक फिगर पार करेल या अनुषंगाने गुजरातमधील मतदारांचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात अाला. त्यासाठी सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान ५० विधानसभा मतदारसंघांतील २०० मतदान केंद्रांवर जाऊन ३,६५५ लोकांचा कल विचारात घेतला तेव्हा गुजरातमधील निवडणूक भाजपसाठी वाटते तेवढी साेपी नाही हे दिसून अाले. या निवडणुकीत राज्यात भाजपला ९५ जागांवर समाधान मानावे लागेल  तर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ हाेऊन सुमारे ८२ जागा मिळू शकतील, तर अन्य पक्ष ५ जागांची कमाई करतील, असा अंदाज सर्व्हेक्षातून व्यक्त करण्यात अाला.


उत्तर गुजरातमध्ये ग्रामीण भागातील ४१ टक्के कल भाजपकडे वळताना दिसताे, तर काँग्रेसला ५६ टक्के पसंती मिळताना दिसते. या तुलनेत शहरी भागात भाजपला अधिक अनुकूलता असून ५० टक्के पसंती भाजपसाेबत, तर काँग्रेसला ४१ टक्के दिसून येते. उत्तर गुजरातमधील अंतिम कल चाचणीवर दृष्टिक्षेप टाकता येथील सत्ताधारी भाजपला झटका बसेल असे दिसते. उल्लेखनीय म्हणजे या विभागात ५३ मतदारसंघ अाहेत.  


हार्दिक पटेलची लाेकप्रियता अाेसरत चालली आहे. तर जीएसटीमुळे नाराज झालेल्या व्यापारी, उद्याेजकांनी अापला माेर्चा काँग्रेसकडे वळवल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘जीएसटी’ अाणि नाेटबंदीचा ब्रह्मास्त्रासारखा वापर केला त्याचा परिणाम पाहायला मिळत अाहे. 

 

पुढील स्‍लाइ्ड वर पाहा, हार्दिक पटेलची लोकप्रियता किती? आणि कोणत्‍या पक्षाला किती जागा मिळणार...

बातम्या आणखी आहेत...