आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानचा ढाेंगीपणा उघड; भारताची प्रतिक्रिया; हाफिजच्‍या सुटकेवर अमेरिकाही नाराज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/इस्लामाबाद- मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदला मुक्त करण्याच्या निर्णयावर भारत व अमेरिकेने नाराजी दर्शवली अाहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकचा ढाेंगीपणा पुन्हा एकदा उघड झाल्याची प्रतिक्रिया भारताने व्यक्त केेलीय.


हाफिज सईदला कारागृहातून मुक्त करण्याच्या निर्णयातून पाक या प्रकरणातील अाराेपींना शिक्षा देण्याबाबत किती उदासीन अाहे व पाकिस्तान बंदी असलेल्या दहशतवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात अाणू पाहत अाहे, हेच स्पष्ट हाेत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितले. दुसरीकडे अमेरिकेसह अांतरराष्ट्रीय समूहानेही सईदला साेडण्याचा निर्णय दहशतवादाविराेधातील लढाईला कमकुवत करणारा असल्याचे म्हटले अाहे. दरम्यान, अांतरराष्ट्रीय दबाव पाहून पाकिस्तान सईदला इतर गुन्ह्यांप्रकरणी अटक करू शकताे.
मंुबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदला लाहाेर उच्च न्यायालयाने बुधवारी पुराव्यांअभावी मुक्त करण्याचे अादेश दिले हाेते. या वर्षी ३१ जानेवारीला सईद व त्याचे चार सहकारी अब्दुल उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रेहमान अाबिद व काझी काशिफ हुसैन यांना नजरकैदेत ठेवण्यात अाले हाेते.


सईदच्या मुक्ततेच्या निर्णयावर बाेलताना अमेरिकेचे संरक्षणतज्ज्ञ ब्रूस रिडल यांनी सांगितले की, मुंबई हल्ल्याला नऊ वर्षे झाली; परंतु अजूनही या हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदवर पाहिजे ती कारवाई झालेली नाही. त्यामुळे पाकचे प्रमुख गैरनाटाे सहयाेगी सदस्यत्व रद्द करण्याची वेळ अाली अाहे.

 

मुक्त हाेण्यापूर्वी व्हिडिअाेतून दिली भारताला धमकी
सईदने बुधवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर एक व्हिडिअाे जारी करून भारताला धमकी दिली. माझी मुक्तता पाक स्वतंत्र झाला त्याचा विजय अाहे. भारत माझे काहीही वाकडे करू शकत नाही. मी काश्मीर स्वतंत्र करू. त्यासाठी लढताेय, असे त्याने या व्हिडिअाेत म्हटलेय.

बातम्या आणखी आहेत...