आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक मुलाला आई-वडिलांचे प्रेम मिळवण्याचा हक्क : हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-  पालकांचे वैवाहिक जीवन विस्कटले असले तरीही प्रत्येक मुलास आपल्या आई-वडिलांचे प्रेम आणि जिव्हाळा मिळवण्याचा हक्क आहे. उपेक्षामुक्त बालपण हा त्याचा अधिकार आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने एका व्यक्तीस अल्पवयीन मुलास भेटण्याचा अधिकार देताना स्पष्ट केले.
 
न्यायालय म्हणाले, आई-वडील दोघांचे प्रेम, लाड, जिव्हाळ्यापासून मुलांना वंचित ठेवणे त्यांच्या हिताचे असत नाही. मूल ज्या पालकाच्या ताब्यात आहे त्याने दुसऱ्या पालकापासून त्यास दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात मुलावर होणारे गंभीर परिणाम त्याला समजत नसतात. न्या. प्रदीप नंद्राजोग व न्या. योगेश खन्ना यांच्या पीठाने हे निर्देश दिले.
 
मुलास शस्त्र बनवणे त्याचे भावनिक शोषण
न्यायालय म्हणाले, आई-वडिलांच्या भांडणात मुलाचा हक्क व दुसऱ्या पालकाला त्याची भेट घेण्याचा अधिकार यातून वाद विकोपाला जातो. सूड उगवण्यासाठी जोडप्यातील एखादा पालक निरागस मुलांना शस्त्रासारखा वापर करतो. मात्र, यासोबत तो मुलाचे भावनिक व मानसिक शोषण करतो हे विसरतो. मुलाच्या भविष्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...