आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या शहरांत गृहकर्जाची मागणी वर्षांत सर्वात जास्त, मोठ्या शहरांत विक्रीत ४% घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील छोट्या शहरांत गृहकर्जाची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. उत्पन्नातील वाढ, वाढते शहरीकरण आणि कमी व्याजदरामुळे यामध्ये मागणी वाढल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ दरम्यान गृहकर्जाच्या मागणीत १२.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ सहा वर्षांतील सर्वात जास्त आहे. विविध बँकांच्या कर्ज मागणीत १७ ते २५ टक्के वाढ झाली असून सर्वात जास्त मागणी २० ते ४० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची आहे.

दुय्यम शहरात गृहकर्जाची मागणी वाढली असल्याचे एसबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दळणवळणातील सुविधा वाढल्याने तसेच कमी किमती आणि राेजगाराच्या संधी यामुळे ही मागणी वाढल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. गृहकर्जाच्या बाबतीत देशातील बँकांना १८ टक्के वाढीची अपेक्षा अाहे.

कोटी नव्या घरांची २०२२ पर्यंत आवश्यकता
गृहकर्जात कर्ज अडकण्याची (एनपीए) शक्यता कमी असते. एनपीएची सर्वात जास्त थकबाकी कंपन्यांकडे आहे. बँकांचे ४.५ टक्के कर्ज अडकले असल्याचे एक अहवाल सांगताे. दुसरीकडे गृहकर्जासहित रिटेल क्षेत्रात फक्त एक टक्के कर्ज अडकले आहे. बँकांच्या एकूण कर्जात गृह कर्जाची भागीदारी एकतृतीयांश आहे.

मध्यम किमतीची जास्त मागणी
अमेरिकेत मालमत्ता खरेदीत कॅनडा आणि चीननंतर भारतीयांचा क्रमांक लागतो. येथे त्यांनी गेल्या वर्षात सुमारे ५५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर लंडनमध्ये त्यांनी १०,००० कोटी रुपये गुंतवले.

देशातील आठ मोठ्या शहरांत २०१५ मध्ये घरांच्या विक्रीत टक्क्यांची घट झाल्याचे मत नाइट फ्रेंकने व्यक्त केले आहे. यात एनसीआर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या क्षेत्रात कशी आहे कर्जाची मागणी...