आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जगात सर्वात तरुण देश, पण आशियात कारभारात धिमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्रसिंह भदौरिया, दिल्ली/विनोद यादव, मुंबई/सौरभ भट्ट, जयपूर - दिल्लीच्या मयूर विहारात राहणाऱ्या रवींद्र यांनी एका वर्षापूर्वी गॅस कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. १५ दिवस उलटूनही काहीच कार्यवाही न झाल्याने ते कंपनीच्या कार्यालयात गेले. अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती तेथे मिळाली. कारण होते - ऑनलाइन अर्ज पूर्ण पत्ता स्वीकारत नव्हता.
पुन्हा अर्ज करावा लागला. अखेर १० दिवसांनी कनेक्शन मिळाले. हे उदाहरण सिस्टिम ऑनलाइन असूनही सर्वसामान्यांना वेळेवर सुविधा मिळत नाही, याची प्रचिती देणारे आहे. असेच चित्र भारताच्या सरकारी कार्यालयांतही आहे. पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक िरस्क कन्सल्टन्सीच्या एका अहवालात भारतीय नोकरशाही आशियात सर्वात बेकार, सर्वात हळू निर्णय घेणारी असल्याचे म्हटले आहे. १९ राज्यांत लोकसेवा हमी आणि सिटिझन चार्टर लागू असूनही हे चित्र आहे. प्रख्यात लेखिका व मनी लाइफ फाउंडेशनच्या सुचेता दलाल म्हणाल्या, सरकारने तक्रारी ऐकण्यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले तेव्हा तक्रारींचा वेळेवर निपटारा होईल, अशी अशा होती. मात्र या तक्रारी वेगवेगळ्या कार्यालयांत तशाच पडून राहत आहेत. कट्स या ग्राहक संघटनेचे सरचिटणीस प्रदीप मेहता म्हणाले, बहुतेक राज्ये व केंद्रीय सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी लेखी अर्ज-निवेदने स्वीकारलीच जात नाहीत. विशेष म्हणजे देशात फक्त २५ टक्के लोकांकडेच इंटरनेट आहे.

वेळेवर सेवा न पुरवल्यास अधिकाऱ्यांना दंड ठोठावण्याची तरतूद आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीच तसे होते. विकासात्मक अर्थतज्ज्ञ ज्यां द्रेज म्हणाले, ऑनलाइन सेवा सर्वसामान्यांना सोईस्कर ठरणाऱ्या बनवल्या तरच त्यांचा चांगला वापर होऊ शकतो. सरकारी नियंत्रण आणि खासगी लोकांच्या फायद्यासाठी त्या नसाव्यात. मुंबई ट्रान्स्पोर्ट फोरमशी जुळलेल्या ऋषी अग्रवाल यांनी सांगितले, आजही लोकांना वाहनांची नोंदणी करण्यासाठी सरकारी कार्यालयांत खेट्या घालाव्या लागतात. ब्रिटनमध्ये ही पद्धत पूर्णपणे ऑनलाइन आहे. सामाजिक कार्यकर्त्या अरुणा राॅय यांच्यानुसार, आजही ज्येष्ठ नागरिक पेन्शन, वीज जोडणीसारखी कामे वेळेवर होऊ शकत नाहीत. सरकारने जबाबदारी कायदा अाणला पाहिजे, जेणेकरून निर्धारित वेळेत कामे होतील.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, निर्णय प्रलंबित, याचा सामान्यांच्या जीवनावर असा परिणाम...
बातम्या आणखी आहेत...